- हजारो महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देत आत्मनिर्भर बनविण्यामध्ये योगदान देणाऱ्या ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ व ‘अन्नपूर्णा परिवारा’ च्या संस्थापक आणि गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसेनानी प्रेमाताई पुरव यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
- केंद्र सरकारने 2002 मध्ये पद्मश्री किताबाने त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.
अन्नपूर्णाच्या कामाला चालना…
- इंदिरा गांधी यांनी केलेल्या बँकांच्या राष्ट्रीयीकरणामुळे 20 टक्के कर्ज दुर्बल घटकांना द्यायचे धोरण आले.
- त्याचा उपयोग ‘अन्नपूर्णा’च्या बायकांचे गट करून त्यांच्यासाठी कर्ज घेण्यासाठी झाला आणि ‘अन्नपूर्णा’च्या कामाला चालना मिळाली.
- नवऱ्याचे नाव लावल्याने दारूडे नवरे बायकांकडे कर्जातला हिस्सा मागू लागले. त्यावर बँकवाल्यांशी झगडून प्रेमाताईंनी मार्ग काढले.
- आईचे नाव मुलाला लावता येणे, घरावर नवऱ्याबरोबर बायकोचे नाव हवे यासाठी प्रेमाताईंचे प्रयत्न पुढे यशस्वी झाले.
- ‘मायक्रोक्रेडिट’ची कल्पना इला भट, जया अरुणाचलम आणि प्रेमाताई अशा तिघींनी आणली.