Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

फूड प्लॅनेट पुरस्कार 2025 Food Planet Awards 2025

  • Home
  • June 2025
  • फूड प्लॅनेट पुरस्कार 2025 Food Planet Awards 2025
Food Planet Awards 2025

● फूड प्लॅनेट पुरस्कार 2025 चा विजेता स्वीडिश स्टार्टअप, NitroCapt ठरला आहे, ज्याने ‘ग्रीन फर्टिलायझर’ (हरित खत) विकसित केले आहे.
● हे खत प्लाझ्मा तंत्रज्ञान आणि अक्षय ऊर्जेचा वापर करून नायट्रोजन खते (nitrogen fertilizers) शाश्वतपणे तयार करते.
● या ‘ग्रीन फर्टिलायझर’ मुळे जागतिक हरितगृह वायूंचे उत्सर्जन (greenhouse gas emissions) लक्षणीयरीत्या कमी होण्याची क्षमता आहे.
● फूड प्लॅनेट पुरस्कार हा जगातील सर्वात मोठा पर्यावरण पुरस्कार आहे, जो कर्ट बर्गफोर्स फूड प्लॅनेट फाउंडेशन (Curt Bergfors Food Planet Foundation) देते.
● हा पुरस्कार अन्न प्रणालीमध्ये शाश्वत बदल घडवून आणणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दिला जातो.
● 2025 चा फूड प्लॅनेट पुरस्कार, 2 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा आहे.
● फूड प्लॅनेट पुरस्कार (Food Planet Prize) हा एक जागतिक स्तरावरील पुरस्कार आहे, जो जगाला अन्न पुरवठ्यामध्ये लवचिक जैवविविधता (resilient biosphere) टिकवण्यासाठी काम करणाऱ्या उपक्रमांना दिला जातो.
● या पुरस्काराचे उद्दिष्ट जगाला पुन्हा निरोगी बनवणे आणि अन्नसुरक्षेला प्रोत्साहन देणे आहे.
● यावर्षीच्या पुरस्कारासाठी अनेक नामांकने आली होती, त्यापैकी सहा उपक्रमांची निवड ‘शॉर्टलिस्ट’मध्ये झाली होती, आणि त्यातून NitroCapt विजेता ठरला.
● कर्ट बर्गफोर्स (Curt Bergfors) यांनी 2019 मध्ये हा पुरस्कार सुरू केला. ते एक उद्योजक आणि परोपकारी व्यक्ती आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *