Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

बानू मुश्ताक यांना ‘बुकर’ सन्मान Banu Mushtaq wins Booker Prize

Banu Mushtaq wins Booker Prize

● प्रसिद्ध कन्नड लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील बानू मुश्ताक यांना ‘हार्ट लॅम्प’ (हृदय दीप) या कथासंग्रहासाठी ‘बुकर’ पुरस्कार मिळाला.
● या पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या त्या पहिल्याच कन्नड लेखिका ठरल्या आहेत.
● मुश्ताक यांनी भाषांतरकर्त्या दीपा भस्ती यांच्यासह पुरस्कार स्वीकारला.
● दीपा भस्ती यांनी कन्नड पुस्तकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे.
● बुकर पुरस्काराचे मूल्य 50 हजार पौंड इतके आहे.
● हृदय दीप या कथासंग्रहात 12 कथा आहेत.
● या कथा 1990 ते 2023 या सुमारे 30 वर्षांच्या कालावधीत लिहिण्यात आल्या आहेत.
● त्यामध्ये दक्षिण भारतातील पितृसत्ताक समुदायांमधील सत्रियांचा लवचिकता, प्रतिकार, चातुर्य आणि भगिनीभाव याभोवती फिरणाऱ्या कथा आहेत.

अनेक पुरस्कारांनी गौरव

● बानू मुश्ताक यांना अनेक यापूर्वी महत्त्वाच्या स्थानिक आणि राष्ट्रीय पारितोषिकांनी गौरविण्यात आले आहे.
● त्यामध्ये कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार आणि दान चिंतामणी अत्तिमब्बे पुरस्कार यांचा समावेश आहे.
● सन 2004 मध्ये त्यांना ‘पेन ट्रान्सलेशन’ पुरस्कारही मिळाला होता.
● बानू मुश्ताक यांचा जन्म कर्नाटक राज्यातील एका लहानशा शहरात झाला. शेजारपाजारच्या इतर मुलींप्रमाणे त्यांनीही शाळेत उर्दू भाषेतून शिक्षण घेतले. त्यांचे वडील सरकारी नोकर होते.
● बानू यांनी वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी कन्नड शाळेमध्ये प्रवेश घेतला.
● मुश्ताक यांनी कन्नड भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली.
● काही काळानंतर हीच परकी वाटणारी भाषा त्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीची भाषा बनली.

बुकर पुरस्कार: (Booker Prize) एक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कार आहे, जो दरवर्षी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांसाठी दिला जातो.

● हा पुरस्कार सुरुवातीला ‘बुकर प्राइज फॉर फिक्शन’ (Booker Prize for Fiction) म्हणून ओळखला गेला आणि नंतर ‘मॅन बुकर पुरस्कार’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
● 1969 मध्ये बुकर मॅककॉनेल कंपनीने या पुरस्काराची स्थापना केली.
● उद्देश : इंग्रजी भाषेत लिहिलेल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांचा गौरव करणे.

बुकर पुरस्कार विजेते भारतीय

● अरुंधति रॉय: “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स” (1997)
● वी.एस. नायपॉल: (1985)
● सलमान रुश्दी: (1981)
● किरण देसाई: “द इनहेरिटेंस ऑफ लॉस” (2006)
● अरविंद अडिगा: “द व्हाइट टाइगर” (2008)
● गीतांजलि श्री: “टॉम्ब ऑफ सैंड” (2022)
● बानू मुश्ताक: “हार्ट लैंप” (2025)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *