●भारताच्या 19 वर्षीय दिव्या देशमुखने महिलांच्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपलीच सहकारी कोनेरू हम्पीवर ‘टायब्रेक’ मध्ये मात करून विजेतेपद पटकावले.
● ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय होण्याचा मानही तिने मिळवला.
● विशेष म्हणजे ग्रँडमास्टर किताबही तिने मिळवला.
इतिहासात प्रथमच कोरले भारताचे नाव
● महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचे नाव विश्वचषकावर कोरले गेले. या दोघींच्या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती. नागपूरकर दिव्याने टायब्रेकरमध्ये पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या डावात वेगवान खेळ करत हम्पीवर दडपण टाकले. दडपणात आलेल्या हम्पीकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या दिव्याने कमाल केली
● ती भारताची ८८वी ग्रँडमास्टर ठरली तर हम्पी, द्रोणावल्ली हरिका आणि आर. वैशाली यांच्यानंतर चौथी भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली.
● दिव्या ही मूळची महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणची आहे.
● बातुमी (जॉर्जिया) येथे ही स्पर्धा संपन्न झाली.
● बक्षीस : विजेतेपदासाठी दिव्याला 50 हजार डॉलर, तर उपविजेत्या हम्पीला 35 हजार डॉलर.
दिव्याची कारकीर्द
● 2020 : ऑलिम्पियाडच्या सुवर्णपदक विजेत्या संघाची सदस्य
● 2021 : आंतरराष्ट्रीय मास्टर
● 2022 : ‘इंडियन चेस’ स्पर्धेत जेतेपद
● 2022 : बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक कांस्यपदक
● 2023 : आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद
● 2023 : टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या जलद (रॅपिड) गटात पहिली
● 2024 : शारजा चॅलेंजर्स स्पर्धेचे विजेतेपद
● 2024 : युवा जागतिक बुद्धिबळ विजेती
● 2024 : ऑलिम्पियाडमध्ये सांघिक आणि वैयक्तिक सुवर्ण
● 2025 : महिला विश्वचषक जेतेपदासह ‘ग्रँडमास्टर’ किताब
● ग्रैंडमास्टर होण्यासाठी खेळाडूंना तीन निकष (नॉर्म) पूर्ण करावे लागतात. यासह खेळाडूला पारंपरिक प्रकारात २५०० किंवा त्याहून अधिक एलो गुण मिळवावे लागतात.
● काही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्यानंतरही खेळाडू ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवू शकतो.
● यामध्ये ‘फिडे’ महिला विश्वचषकाचाही समावेश आहे. दिव्याने ही स्पर्धा जिंकत ‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवला.
दिव्याला ११ लाखांचा पुरस्कार
● ‘दिव्याने जागतिक पातळीवर मिळविलेले यश अभूतपूर्व आणि देदिप्यमान आहे.
● यामुळे महाराष्ट्राचा लौकिक वाढला आहे. आम्ही महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने दिव्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे ठरविले आहे. ही रक्कम वाढू शकते,’ अशी घोषणा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके यांनी केली.