पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रीपदी दियाकुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांनी शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्र यांनी शपथ दिली.
भजन लाल शर्मा : (जन्म 15 डिसेंबर 1967)
• राजस्थानचे ते 14 वे मुख्यमंत्री आहेत. ते भरतपूर जिल्ह्यातील आहेत.
• जयपूरमधील संगाणेर मतदारसंघातुन ते 48,081 इतक्या मताधिक्याने निवडून आले.
• शर्मा यांनी शालेय दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
• अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. नंतर ते तेथे जिल्हा सहसंयोजक आणि सह-जिल्हाप्रमुख झाले.
• पुढे ते भारतीय जनता युवा मोर्चामध्ये सामील झाले आणि वयाच्या 27 व्या वर्षी त्यांच्या मूळ गावचे सरपंच झाले.
• ते सलग चौथ्यांदा भारतीय जनता पार्टी, राजस्थानचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.