Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत – अमेरिका दरम्यान संरक्षण करार

भारत - अमेरिका दरम्यान संरक्षण करार

मायक्रोक्रिस्टलचा शोध

  • इलेक्ट्रॉनिक उपकरणांतील डिटेक्टर, एलईडी लाईट्स आणि सोलर सेलमध्ये सिलिकॉन फोटोडिटेक्टर्सचा वापर होतो. मात्र त्याला काही मर्यादा आहेत.
  • इलेक्ट्रॉनिक्स उपकरणाची कार्यक्षमता, वेग आणि उत्पादकता वाढविण्यासाठी जगभरात पेरोस्काईट (सीझियम लीड ब्रोमाइड) या नव्या पदार्थावर संशोधन चालू आहे.
  • मात्र उच्च तापमानाला त्याची स्थिरता टिकत नसल्याने शास्त्रज्ञांना यश मिळत नव्हते.
  • अखेरीस पुण्यातील शास्त्रज्ञांनी सीझियम लीड ब्रोमाइडचा मायक्रोक्रिस्टर बनविण्यात यश आले असून, तो सिलिकॉन डिटेक्टरपेक्षा 100 पटींनी संवेदनशील आहे.
  • भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) शास्त्रज्ञ डॉ. अतिकुर रेहमान यांच्या नेतृत्वात गोकूळ अनिलकुमार यांनी हे संशोधन केले.
  • आयसर पुणेचे प्रा. पवन कुमार, आयसर मोहालीचे डॉ. गौतम शीट व अमेरिकेतील ब्रुकहेवन नॅशनल लॅबोरेटरीचे डॉ. सूयोन ह्वांग यांचाही शोधात मोठा वाटा आहे.
  • सीझियम लीड ब्रोमाइडचा सूक्ष्म स्फटिक बनविण्यासाठी शास्त्रज्ञांच्या या गटाने नवीन पद्धत विकसित केली आहे. त्यांचे हे संशोधन नुकतेच अॅडव्हान्स मटेरिअल्स या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले.

काय आहे सीझियम लीड ब्रोमाइड?

  • एक प्रकारचे पेरोस्काइट मटेरिअल आहे.
  • प्रकाशाच्या बाबतीत अतिसंवेदनशील असलेल्या या पदार्थात उत्कृष्ट ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स गुण असतात.
  • आजवर उच्च तापमानाला स्थिर राहत फेरोइलेक्ट्रिक गुण आणि अल्ट्रा डार्क करंट मिळत नव्हते. नव्या संशोधनातून त्यावर मात केली आहे.

संशोधनाची वैशिष्ट्ये:

  • सॉल्वोथर्मल संश्लेषण पद्धतीचा वापर करत सीझियम लीड ब्रोमाइडची निर्मिती
  • वातावरणीय तापमानालाही याची निर्मिती करणे शक्य

फायदा काय ?

  • प्रथमच उच्च तापमानाला आवश्यक गुण दर्शविणाऱ्या पेरोस्काइट निर्मितीच्या प्रक्रियेचा शोध
  • फेरोइलेक्ट्रिक प्रॉपर्टीज दर्शविणारे हे मायक्रोक्रिस्टल्स इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची क्षमता वाढविणार
  • नव्या पिढीतील डिटेक्टर, एलईडी लाइट्स आणि सोलर सेल बनविण्यासाठी उपयुक्त
  • कमी खर्चात जास्त कार्यक्षम डिटेक्टर्सची निर्मिती शक्य

भारत अमेरिका दरम्यान संरक्षण करार

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौऱ्यात दोन देशांदरम्यान दोन महत्त्वाचे करार झाले.
  • पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंना प्राधान्य आणि संपर्क अधिकाऱ्याच्या कामकाजासंबंधी हे करार करण्यात आले.
  • अमेरिकेबरोबरील धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
  • राजनाथ सिंह यांचा हा चार दिवसांचा दौरा आहे.
  • या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे संरक्षण मंत्री ऑस्टिन लॉइड यांची भेट घेणार आहेत.
  • भारत आणि अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेला बळ देणाऱ्या एकमेकांच्या वस्तू आणि सेवांना प्राधान्य द्यायचे आहे.
  • पुरवठा व्यवस्थेच्या मदतीने दोन्ही देश आपापल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या गरजेनुसार आवश्यक असलेल्या औद्योगिक वस्तूंची आयात एकमेकांकडून करू शकणार आहेत.
  • या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध आणखी दृढ होतील.
  • अमेरिकेने अशा प्रकारचा करार केलेला भारत हा 18 वा देश ठरला आहे.

 जागतिक कुस्ती स्पर्धेत भारत अव्वलस्थानी

  • अम्मान(जॉर्डन) या ठिकाणी सुरू असलेल्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत अव्वलस्थान पटकावले.
  • या स्पर्धेत  महाराष्ट्राच्या श्रुतिका पाटील हिने रोप्य पदक पटकावले.

काजलला सुवर्ण; भारत अव्वल

  • भारताच्या काजलने सुवर्णपदक मिळवले.
  • या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती भारताची पाचवी कुस्तीगीर ठरली. तिने 69 किलो गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या ओलेकसांद्रा रायबाकवर 9-2 असा विजय मिळवला.
  • यासह भारताने या स्पर्धेत पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली.
  • एकूण 185 गुणांसह भारतीय संघाने अव्वल क्रमांक पटकावला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *