Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारत आणि कतार यांच्या संयुक्त गुंतवणूक कृती दलाची पहिली बैठक संपन्न

  • Home
  • Current Affairs
  • भारत आणि कतार यांच्या संयुक्त गुंतवणूक कृती दलाची पहिली बैठक संपन्न
  • भारत आणि कतार यांच्या नेतृत्वांनी मांडलेल्या दृष्टीला अनुसरून आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त गुंतवणूक कृती दला- (जेटीएफआय) ची पहिली बैठक 6 जून रोजी नवी दिल्ली इथे पार पडली.
  • या कृती दलाचे संयुक्त अध्यक्षपद केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्त व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ आणि कतारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे उपसचिव मोहम्मद बिन हसन अल्-मल्की यांनी भूषवले.
  • दोन्ही देशांच्या वाढ आणि समृद्धीसाठी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याकरता, पायाभूत सुविधा, ऊर्जेपासून ते तंत्रज्ञान व नवोन्मेषाला चालना देणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकींच्या संधी लक्षात घेऊन दोन्ही देशांची एकत्रित क्षमता वापरून वाढीला गती देण्याकरता हे संयुक्त कृती दल वचनबद्ध असल्याबाबत या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला.
  • दोन्ही देशांची सर्वसमावेशी विकासाची समान दृष्टी, समान मूल्ये आणि उद्दीष्टे लक्षात घेऊन ‘जेटीएफआय’ने भारत आणि कतार यांच्यातील आर्थिक संबंध बळकट असण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *