भारत – मलेशिया यांच्यात महत्त्वपूर्ण करार
- भारत आणि मलेशियातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यात व्यापक द्विराष्ट्रीय चर्चा करण्यात आली .
- दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक आणि संरक्षण इत्यादी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या .
- यामध्ये मलेशियातील भारतीय युवकांना नोकर भरतीची संधी उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याच्या कराराचाही समावेश आहे.
काही महत्त्वाचे निर्णय:
- डिजिटल तंत्रज्ञानातील सहकार्य वाढविण्यासाठी डिजिटल परिषदेची स्थापना करणार
- स्टार्टअप आघाडी उभारणार
- मलेशियातील टुंकू अब्दुल रहमान विद्यापीठात आयुर्वेद अध्यासनाचे निर्मिती होणार
भारतीय नौदलाचा बीईएमएल कंपनीशी सामंजस्य करार
- भारतीय नौदलाकडून वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सागरी अभियांत्रिकी उपकरणांचे स्वदेशीकरण करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलत बीईएमएल या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील ‘वर्ग अ’ श्रेणीतील आणि भारताच्या आघाडीच्या संरक्षण आणि अवजड अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादन कंपनीने 20 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय नौदलाशी सामंजस्य करार केला आहे.
- नवी दिल्ली येथील नौदलाच्या मुख्यालयात भारतीय नौदलाचे एसीओएम (डी आणि आर) रियर अॅडमिरल के श्रीनिवास आणि बीईएमएलचे संरक्षण विभाग संचालक अजित कुमार श्रीवास्तव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
- हा उपक्रम म्हणजे महत्त्वपूर्ण सागरी अभियांत्रिकी उपकरणे तसेच यंत्रणा यांची स्वदेशी रचना, विकास, निर्मिती, चाचणी आणि उत्पादनविषयक पाठबळासाठी द्विपक्षीय सहकार्यात वाढ करण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
- भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला अनुसरत, संरक्षण क्षेत्रातील उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबन बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे तसेच परदेशी ओईएमएस (अस्सल उपकरणे निर्माते)वरील अवलंबित्व कमी करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.
महिला टी – 20 विश्वचषक बांगलादेश ऐवजी अमिरातील होणार
- बांगलादेश मधील सध्याची अस्थिर आणि अनिश्चित परिस्थितीमुळे तेथे नियोजित असलेली महिला टी – 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अखेर आयसीसीने अमिराती येथे खेळवण्याचे निश्चित केले आहे.
- ही स्पर्धा 3 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत होईल.
- स्पर्धेतील सर्व सामाने दुबई आणि शारजा येथे होणार आहेत.
एकाच षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम
- समोआ या देशाचा फलंदाज डॅरिअस व्हिसेरने आंतरराष्ट्रीय टी- 20 क्रिकेटमधील एकाच षटकात सर्वाधिक 39 धावा फटकावण्याचा विक्रम नोंदवला.
- टी-20 वर्ल्ड कपच्या ‘ईस्ट-आशिया पॅसिफिक विभागीय पात्रता फेरी’तील व्हानूआटूविरुद्धच्या लढतीत डॅरिअसने ही धडाकेबाज खेळी केली.
- त्याने 62 चेंडूंत वैयक्तिक 132 धावा तडकावल्या आहेत. यात 14 षटकार व 5 चौकारांचा समावेश आहे.
- कारकिर्दीतील आपली तिसरी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट लढत खेळणाऱ्या 28 वर्षी डॅरिअसने प्रतिस्पर्धी गोलंदाज नलिन निपिको याच्या षटकात सहा षटकार लगावले, तर त्याला तीन नो-बॉलही लाभले.
- आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एकाच षटकात सहा षटकारांची वसुली होण्याची ही चौथी वेळ असली, तरी एकाच षटकात 36 पेक्षा जास्त म्हणजेच सर्वाधिक 39 धावा मात्र या निमित्ताने प्रथमच झाल्या.
आंतरराष्ट्रीय टी – 20 मध्ये एकाच षटकात सहा षटकार खेचणारे फलंदाज
1) युवराज सिंग (भारत)
2) कायरन पोलार्ड(वेस्ट इंडिज)
3) दिपेंद्र सिंग(नेपाळ)
4) डॅरिअस व्हिसेर(समोआ)