Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

“भारताचा आफ्रिकेसोबतचा ऐतिहासिक प्रवास: एकत्रित मार्गक्रमण” या संकल्पनेवर राष्ट्रीय संग्रहालय आणि दक्षिण आफ्रिका उच्चायुक्त यांचे प्रदर्शन

  • Home
  • Current Affairs
  • “भारताचा आफ्रिकेसोबतचा ऐतिहासिक प्रवास: एकत्रित मार्गक्रमण” या संकल्पनेवर राष्ट्रीय संग्रहालय आणि दक्षिण आफ्रिका उच्चायुक्त यांचे प्रदर्शन

दर वर्षी 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक आदर्श असलेल्या नेल्सन मंडेला यांचे आयुष्य आणि वारशाचे महत्व अधोरेखित करून शांती आणि स्वातंत्र्याच्या संस्कृतीतील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा हा एक मार्ग आहे.

या वर्षी(2023) विवेकानंद आंतरराष्ट्रीय फाउंडेशनने राष्ट्रीय संग्रहालय आणि दक्षिण आफ्रिका उच्चायुक्त यांच्याबरोबर भागीदारीतून या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करून नेल्सन मंडेला यांचा जन्म दिवस साजरा केला.

राष्ट्रीय संग्रहालय येथे आयोजित “भारताचा आफ्रीकेसोबतचा ऐतिहासिक प्रवास: एकत्र मार्गक्रमण” या प्रदर्शनाचे उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचे उच्चायुक्त जोएल सिबुसिसो डेबेले आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांचे सचिव (आर्थिक संबंध) दम्मू रवी 18 जुलै 2023 रोजी केले. यावेळी मंडेला यांची तत्वे आणि मानवतेच्या सेवेसाठी असलेले समर्पण अधिरेखीत केले.

उद्घाटनपर भाषणात दक्षिण आफ्रिकेचे उच्चायुक्त जोएल सिबुसिसो डेबेले यांनी आफ्रिका आणि भारतातून वसाहती घालवण्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली आणि ग्लोबल साउथचा पुरस्कर्ता म्हणून भारताचे महत्व अधोरेखित केले.

दम्मू रवी, सचिव (आर्थिक संबंध), परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शन यांचे महत्व अधोरेखित केले.

आफ्रिकन महासंघाला जी-20 चे कायमस्वरूपी सदस्य म्हणून सामावून घेण्याच्या भारताच्या कटीबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

आफ्रिकन कला आणि संस्कृती राष्ट्रीय वस्तू संग्रहलयातून कशी प्रदर्शित करता येईल, आणि आफ्रिकन वस्तू संग्रहालयांसोबतच अस्तित्वात असलेल्या सामंजस्य करारांचा आफ्रिकन संस्कृती आणि भारत-आफ्रिका संबंधांचे दर्शन संपूर्ण जगाला करुन देण्यासाठी कसा वापर करता येईल, यावर भर देण्यात आला

18 जुलै 2023 पासून सुरू झालेले हे प्रदर्शन “भारताचा आफ्रिकेसोबतचा ऐतिहासिक प्रवास : एकत्रितपणे पुढची वाटचाल” भारत आणि आफ्रिकेदरम्यानची ऐतिहासिक मैत्री आणि आजच्या काळातील संबंध दाखवणारे आहे.

ख्रिस्तपूर्व आठव्या शतकापासून भारत आणि आफ्रिकन देशांदरम्यान नियमित व्यापार आणि संबंध राहिलेले आहेत.

आजही भारत आणि आफ्रिकेदरम्यान, अत्यंत मजबूत भागीदारी असून, क्षमता बांधणी, विकासविषयक सहकार्य तसेच आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक उपक्रम याद्वारे दोन्ही देशांचा समान विकास करण्याचे उद्दिष्ट साध्य केले जात आहे. हा उपक्रम, हे प्राचीन आणि दृश बंध साजरे करण्याची एक महत्वाची संधी आहे.

प्रदर्शनाचा मुख्य उद्देश:

या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश, मंडेला डे साजरा करणे हा असून त्याद्वारे नेल्सन मंडेला यांनी दिलेली मूल्ये आणि मानवतेची सेवा करण्यासाठीची त्यांची वचनबद्धता, यांचा सन्मान करणे तसेच भारत-आफ्रिका यांच्यातील जुने तसेच आजचे संबंध याविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.

हे प्रदर्शन 30 जुलै 2023 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरू असेल.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *