एकीकडे चंद्रयान तीन हे अंतराळ यान चंद्राच्या अभ्यास करण्यासाठी अंतराळात सोडले असतानाच आता भारताने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या सूर्ययान मोहिमेची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ‘आदित्य -एल 1’ हे सूर्ययान आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवण अंतराळ केंद्रात आणून ठेवण्यात आले आहे. लवकरच हे यान अंतराळात झेपवणार आहे. सूर्यावरील घडामोडी चुंबकीय वादळे यांचा अभ्यास केला जाणार आहे. बंगळुरूतील यू .आर. राव उपग्रह केंद्रामध्ये हे यान तयार करण्यात आले आहे. ‘आदित्य- एल 1’ हे यान सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान प्रभामंडळ कक्षेत लॅगरेंज पॉईंट -1 येथून सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे अंतर पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर आहे. लॉगरेंज पॉईंट-1 येथून कोणत्याही अडथळा आणि ग्रहणाशिवाय सूर्याचे सातत्याने निरीक्षण करणे शक्य होणार आहे. यामुळे सौरक्रियाकल्पांचे निरीक्षण करण्याचा आणि अवकाशातील हवामानावर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी या अंतराळ यानामध्ये सात पेलोड आहेत. सूर्य आणि पृथ्वी दरम्यानच्या एल-1 या कक्षेतून चार पेलोड थेट सूर्याची निरीक्षण करणार आहेत आणि उर्वरित तीन पेलोड एन- 1 वर फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करणार आहे.


