- ज्या बालकांना 2023 मध्ये एकही लस देण्यात आलेली नाही अशा बालकांच्या संख्येमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे.
- भारतातील सुमारे 16 लाख बालकांना या वर्षात एकही लस देण्यात आलेली नाही,
- नायजेरियाचा यात पहिला क्रमांक असून त्या देशात झिरो डोस बालकांची संख्या 21 लाख इतकी आहे .
- युनिसेफच्या अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.
अहवालातील निरीक्षणे:
- 2019 मधील कोरोनाच्या साथीपूर्वीच्या तुलनेत 2023 मध्ये 27 लाख बालके लशीपासून वंचित
- लस न घेतलेल्या मुलांना गंभीर आजार होण्याचा धोका
- शून्य लसीकरणातील 20 देशांच्या क्रमवारीत चीनचा 18 वा तर पाकिस्तानचा 10 वा क्रमांक
- लसीकरण न झालेल्या बालकांच्या 2021मधील संख्येच्या आधारे 20 देशांना ‘लसीकरण मोहीम 2030’ साठी प्राधान्य
- भारतात गोवरप्रतिबंध लशीचा(एमसीव्ही १’) पहिला डोस न घेतलेल्या बालकांची संख्या 2023मध्ये 16 लाख होती. यात देशाचा क्रमांक तिसरा होता
- राष्ट्रीय लसीकरण धोरणानुसार साधारणपणे 9 किंवा 12 महिन्यांच्या बालकांना ‘एमसीव्ही १’ लसीकरण केले जाते. यात ९३ टक्क्यांपर्यंत घट
- लसीकरणाचे प्रमाण 2019 पेक्षाही 93 टक्के होते. 2023 मध्ये ते आणखी कमी झाले.
2023 मध्ये ‘झिरो डोस’ बालकांची संख्या सर्वाधिक असलेले देश:
1) नायजेरिया – 21 लाख
2) भारत – 16 लाख
3) इथिओपिया – 9.17 लाख
4) कांगो – 8.39 लाख
5) सुदान – 7.01 लाख