Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 एचपी इंजिनची पहिली चाचणी

संरक्षण सचिव गिरिधर अरमाने यांच्या अध्यक्षतेखाली 20 मार्च 2024 रोजी म्हैसूर संकुलातील बीईएमएलच्या इंजिन विभागात मुख्य रणगाड्यांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या 1500 अश्वशक्तीच्या इंजिनची पहिली चाचणी घेण्यात आली. ही कामगिरी देशाच्या संरक्षण क्षमतेच्या नव्या युगाची सुरुवात आहे, यात संरक्षण तंत्रज्ञानातील तांत्रिक कौशल्य आणि आत्मनिर्भरतेची वचनबद्धता दिसून येते.

अधिक माहिती
• हे 1500 एचपीचे इंजिन लष्करी प्रणोदन (गाडी पुढे ढकलणारी) प्रणालींमधील एक आदर्श बदल दर्शवते.
• उच्च शक्ती – ते – वजन गुणोत्तर, समुद्र सपाटीपासून अधिक उंचीवर, उणे शून्य तापमानात आणि वाळवंटातील वातावरणासह अत्यंत टोकाच्या परिस्थितीतही कार्यक्षमता सिद्ध करणारी अत्याधुनिक वैशिष्ट्ये यात आहेत.
• प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे इंजिन जागतिक स्तरावरील सर्वात प्रगत इंजिनांच्या तोडीचे आहे.
• 1500 एचपी इंजिनच्या पहिल्या चाचणीने, तंत्रज्ञान स्थिरीकरणावर लक्ष केंद्रित करून, पहिल्या पिढीचे काम पूर्ण झाल्याचे सूचित केले आहे.
• दुसऱ्या पिढीमध्ये लढाऊ वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, डीआरडीओच्या प्रयोगशाळेत विविध चाचण्यांसाठी बीईएमएल इंजिने तयार करेल आणि वापरकर्त्याच्या चाचणीसाठी वास्तविक वाहनांमध्ये त्यांचे एकत्रीकरण करेल.
• हा प्रकल्प 2025 च्या मध्यापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
• हा प्रकल्प ऑगस्ट 2020 मध्ये सुरु करण्यात आला.
• तो वेळेवर पूर्ण होणे आणि गुणवत्ता मानकांचे पालन व्हावे याची खातरजमा करण्यासाठी पाच प्रमुख टप्प्यांमध्ये तो काळजीपूर्वक संरचित करण्यात आला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *