Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय तटरक्षक दलाचे २५ वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

  • Home
  • Current Affairs
  • भारतीय तटरक्षक दलाचे २५ वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती

भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून राकेश पाल यांची नियुक्ती झाली आहे.

राकेश पाल यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा:-

  • राकेश पाल हे भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत.
  • जानेवारी 1989 मध्ये ते भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले.
  • कोची येथे इंडियन नेव्हल स्कूल द्रोणाचार्य, येथे त्यांनी तोफखाना आणि शस्त्रे प्रणालींमध्ये विशेष व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे.
  • युनायटेड किंगडममधून त्यांनी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स फायर कंट्रोल सोल्यूशन अभ्यासक्रम केला आहे.
  • भारतीय तटरक्षक दलाचे पहिले गनर म्हणून ते ओळखले जातात.

पाल यांची महत्वाच्या पदावर नियुक्ती:

  • 34 वर्षांच्या आपल्या दिमाखदार कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांची नियुक्ती झाली आहे.
  • कमांडर कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर पश्चिम), गांधीनगर, उपमहासंचालक (नीती आणि योजना), आणि
    नवी दिल्लीत भारतीय तट रक्षक दलाच्या मुख्यालयात अतिरिक्त महासंचालक ही त्यातील प्रमुख पदे आहेत.
  • नवी दिल्ली येथे तटरक्षक दलाच्या मुख्यालयात संचालक (पायाभूत सुविधा आणि कामे) आणि प्रधान संचालक (प्रशासन) म्हणून त्यांनी उत्तमपणे कामगिरी बजावली आहे.

अनेक मोहिमांत महत्वपूर्ण भूमिका निभावली:

  • पाल यांनी सागरी मोहिमांचा मोठा अनुभव आहे.
  • सर्व समर्थ, आयसीजीएस विजीत, आयसीजीएस सुचेता कृपलानी, आयसीजीएस अहिल्याबाई, आणि आयसीजीएस सी -03 या तटरक्षक दलाच्या सर्व प्रकारच्या जहाजांवर अधिकारी म्हणून काम केले आहे.
  • गुजरातमधील फॉरवर्ड एरियाच्या ओखा आणि वाडीनार या दोन तटरक्षक तळांवरही त्यांनी अधिकारी म्हणून कामाचा अनुभव घेतला आहे.
  • राकेश पाल यांना फेब्रुवारी 2022 मध्ये अतिरिक्त महासंचालक पदावर बढती मिळाली आणि त्यांची नवी दिल्ली येथे तटरक्षक दल मुख्यालयात नियुक्ती झाली.
  • फेब्रुवारी 2023 मध्ये तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार त्याच्याकडे सोपवण्यात आला. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा राबवल्या.
  • त्यात अंमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त करणे, तीव्र चक्रीवादळाच्या वेळी नाविकांची सुटका करणे, परकीय तटरक्षक दलांसोबत संयुक्त सराव, तस्करी विरोधी कारवाया, चक्रीवादळ/नैसर्गिक आपत्ती दरम्यान मानवतावादी मदत आणि किनारी सुरक्षा सराव यांचा समावेश आहे.

पाल यांचा सन्मान:-

  • राकेश पाल यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल 2013 मध्ये तटरक्षक पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
  • 2018 मध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक प्रदान करण्यात आले.

भारतीय तटरक्षक दल:

  • इंडियन कोस्ट गार्ड ( ICG ) ही भारताची सागरी कायद्याची अंमलबजावणी आणि शोध आणि बचाव एजन्सी आहे ज्याचे क्षेत्रीय जलक्षेत्र आणि विशेष आर्थिक क्षेत्र यांचा समावेश आहे .
  • हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे .

स्थापनेची घोषणा:- 1 फेब्रुवारी 1977
स्थापना:- 18 ऑगस्ट 1978
बोधवाक्य:- वयम् रक्षामः (आम्ही रक्षण करतो)

मुख्यालय:- नवी दिल्ली
तटरक्षक दल भारतीय नौदल , मत्स्यव्यवसाय विभाग , महसूल विभाग (सीमाशुल्क), आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस सेवा यांच्या निकट सहकार्याने कार्य करते .
1 फेब्रुवारी रोजी तटरक्षक दिन साजरा केला जातो.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *