भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या अत्याधुनिक अपतटीय गस्ती नौकेच्या बांधणीस सुरवात
- मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे 31 मे 2024 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पहिल्या नेक्स्ट-जनरेशन अर्थात अत्याधुनिक अपतटीय गस्ती नौकेसाठीच्या स्टील कटिंग म्हणजेच बांधणीसाठीचा प्रारंभिक प्रक्रिया सुरु करण्याचा समारंभ झाला.
- संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर 2023 मध्ये भारतीय तटरक्षक दलासाठी सुमारे 1,614.89 कोटी रुपये किमतीच्या सहा अत्याधुनिक अपतटीय गस्ती नौकांच्या खरेदीसाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सोबत करार केला होता.
- या प्रकल्पाचे उद्दिष्ट तटीय आणि अपतटीय गस्तीची क्षमता वाढवणे, सागरी क्षेत्रांचे रक्षण करणे आणि कार्यान्वयन कार्यक्षमता वाढवणे हे आहे.
- या गस्ती नौका अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणांनी सुसज्ज आहेत.
- या नौका दोन डिझेल इंजिनांनी सज्ज असून त्या जास्तीत जास्त 23 नॉट्सचा कायम वेग प्राप्त करत सुमारे 5,000 सागरी मैलांपर्यंतचे अंतर कापण्यास सक्षम आहेत. शिवाय, या नौकांवर अविभाज्य दुहेरी -इंजिन हेलिकॉप्टर सुविधा असून यावर जड हेलिकॉप्टरसाठी स्थान, जलद आणि प्रभावी हवाई निरीक्षण आणि प्रतिसाद क्षमता सक्षम करण्यात आली आहे.
- बहुउद्देशीय ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता आणि वायरलेसने नियंत्रित जल बचाव यान यासारखी प्रगत वैशिष्ट्ये अंतर्भूत असलेल्या एनजीओपीव्ही गस्ती नौका भारतीय तटरक्षक दलाला अतुलनीय लवचिकता आणि अत्याधुनिक कार्यान्वयनाची सुविधा प्रदान करतात.
- या गस्ती नौका मे 2027 पर्यंत तयार असल्याचे नियोजित करण्यात आले आहे.
- या गस्ती नौका भारतीय तटरक्षक दल, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि प्रकल्पात सहभागी असलेल्या इतर भागधारकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असतील.
- एनजीओपीव्ही गस्ती नौका प्रकल्प देशाची आत्मनिर्भरता आणि स्वदेशी उत्पादनाची बांधिलकी अधोरेखित करतो.