- शेफाली वर्माचे विक्रमी द्विशतक आणि तिने स्मृती मानधनासह दिलेल्या 292 धावांच्या विक्रमी सलामीच्या जोरावर भारताने महिलांच्या एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवसअखेर 4 बाद 525 अशी विक्रमी धावसंख्या रचली.
- वीस वर्षीय शेफालीने 197 चेंडूंत 23 चौकार व 8 षटकारांसह 205 धावा केल्या.
- एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे ही कसोटी सुरू आहे.
- भारताने पहिल्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर द. आफ्रिकेविरुद्ध 4 बाद 525 धावा केल्या.
- या कसोटी इतिहासातील (महिला आणि पुरुष) एका दिवसातील सर्वाधिक धावा ठरल्या.
- याआधी पुरुषांच्या कसोटीत श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध एका दिवसात 9 बाद 509 धावा केल्या होत्या.
- महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात पाचशेहून अधिक धावा झाल्या.
- याआधी 1935 मध्ये न्यूझीलंड-इंग्लंड महिला कसोटीत एका दिवसात 475 धावा झाल्या होत्या.
- शेफाली-स्मृतीने 292 धावांची सलामी दिली.
- ही महिला कसोटीतील कुठल्याही विकेटसाठीची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी ठरली.
- ऑस्ट्रेलियाच्या डेनिस अॅनेट्स- लिंडसे रीलर यांनी इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठी 309 धावांची भागीदारी रचली होती.
- शेफालीने 194 चेंडूंत द्विशतक पूर्ण केले.हे महिला कसोटीतील वेगवान द्विशतक ठरले.
- तिने ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडचा विक्रम मोडला.
- अॅनाबेलने या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध 248 चेंडूंत द्विशतक ठोकले होते.