Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय युवा महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता

भारतीय युवा महिला संघ सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता

 

  • गोंगडी त्रिशाच्या (3 बळी आणि नाबाद 44 धावा) दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा महिला संघाने अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव करीत सलग दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याची किमया साधली.
  • विजेत्या संघाला बीसीसीआयने 5 कोटीचे बक्षीस जाहीर केले.
  • विशेष म्हणजे या स्पर्धेचे दोनच पर्व झाले असून दोन्ही वेळा भारतीय संघच जगज्जेता ठरला आहे.
  • भारतीय संघाची कर्णधार : निकी प्रसाद
  • मलेशिया (क्वालालांपुर)येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्व सामने जिंकले.
  • 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्वचषकातही भारतीय संघ अजिंक्य ठरला होता.
  • शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने त्यावेळी अंतिम लढतीत इंग्लंडला धूळ चारली होती.

त्रिशा स्पर्धेत सर्वोत्तम

  • गोंगडी त्रिशाला अंतिम सामन्यातील आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • त्रिशाने स्पर्धेत सर्वाधिक 309 धावा करतानाच आपल्या लेग स्पिन गोलंदाजीने 7 गडी बाद केले.
  • ती उजव्या हाताची फलंदाज असून , उजव्या हाताची लेग स्पिन गोलंदाज आहे
  • पुढील स्पर्धा : 2027(बांग्लादेश, नेपाळ)

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *