Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादुरसिंग सागू यांची निवड

भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादुरसिंग सागू यांची निवड

इस्रोच्या अध्यक्षपदी डॉ. व्ही. नारायणन

  • वरिष्ठअवकाश शास्त्रज्ञ आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे प्रवर्तक डॉ. व्ही. नारायणन यांची दोन वर्षांसाठी अवकाश विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
  • अवकाशविभागाचे सचिवच भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष असल्याने डॉ. नारायणन हे ‘इस्रो’चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतील.
  • 14  जानेवारीलाते एस. सोमनाथ यांच्याकडून पदभार स्वीकारतील.
  • इस्रोचे ते 11 वे अध्यक्ष असतील.

डॉ. व्ही नारायणन यांच्याविषयी..

  • मूळचेतामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील मेलाकट्टू गावचे आहेत
  • तामिळमाध्यम शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या डॉ. नारायणन यांनी क्रायोजेनिक अभियांत्रिकीमध्ये एमटेक आणि आयआयटी खरगपूरमधून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएचडी पूर्ण केली.
  • एमटेकपदवीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्यांना रौप्य पदकदेखील मिळाले.
  • चेन्नईच्यासत्यबामा विद्यापीठातून त्यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ऑनररी पदवी मिळाली.
  • ‘एलपीएससी’च्याअधिकृत वेबसाइटनुसार, नवनियुक्त इस्रो प्रमुखांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
  • डॉ. नारायणनयांना रॉकेट आणि संबंधित तंत्रज्ञानासाठी एएसआय पुरस्कार आणि ॲस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया (एएसआय) कडून सुवर्ण पदक मिळाले आहे.
  • त्यांनीहाय एनर्जी मटेरियल सोसायटी ऑफ इंडियाज टीम अवॉर्ड व्यतिरिक्त उत्कृष्ट कामगिरीसाठी परफॉर्मन्स एक्सलन्स अवॉर्ड आणि टीम एक्सलन्स अवॉर्डसह अनेक इस्रो पुरस्कार प्राप्त केले आहेत.
  • डॉ. व्ही. नारायणनहे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शनमध्ये जवळपास चार दशकांचा अनुभव आहे.
  • त्यांनी1984 मध्ये इस्रोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि विविध पदे हाताळली.
  • सुरुवातीच्याटप्प्यात त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) येथे साउंडिंग रॉकेट्स आणि ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (एएसएलव्ही) आणि पोलर सॅटेलाइट लॉंच व्हेईकल (पीएसएलव्ही) च्या सॉलिड प्रोपल्शन एरियामध्ये काम केले.
  • 2018 मध्येत्यांची लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटर (एलपीएससी) चे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, जे इस्रोच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. त्याचे मुख्यालय तिरुअनंतपुरममधील वलियामाला येथे आहे.
  • यासेंटरमध्ये केंद्र प्रक्षेपण वाहनांसाठी द्रव, सेमी-क्रायोजेनिक प्रोपल्शन टप्पे, उपग्रहांसाठी रासायनिक आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शन प्रणाली, प्रक्षेपण वाहनांसाठी नियंत्रण प्रणाली आणि अंतराळ प्रणालींच्या आरोग्य निरीक्षणासाठी ट्रान्सड्यूसर विकसित केले जाते.

ISRO:(Indian Sapce Research Organisation)

  • (भारतीयअवकाश संशोधन संस्था)
  • स्थापना: 15 ऑगस्ट1969
  • मुख्यालय: बंगळुरू
  • ब्रीदवाक्य: मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान
  • पहिलेअध्यक्ष: विक्रम साराभाई

भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी बहादुरसिंग सागू यांची निवड

  • आशियाईसुवर्णपदक विजेते माजी गोळाफेकपटू बहादूरसिंग सागू यांची अॅथलेटिक्स (एएफआय) महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
  • मागील12 वर्षांपासून आदिल सुमारीवाला या पदावर होते.
  • बहादूरसिंगआता चार वर्षांसाठी (2025-29) अध्यक्षपदावर असतील.

 बहादूरसिंग यांच्याविषयी..

  • 51 वर्षीयबहादूरसिंग जालंधरचे आहेत. ते सध्या पंजाब पोलिसात कमांडंट म्हणून कार्यरत आहेत.
  • बहादूरसिंगयांनी 2002 च्या बुसान आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या गोळा फेकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.
  • 2000 आणि2004 च्या ऑलिम्पिक्समध्ये भारताने प्रतिनिधित्व.
  • त्यांना’पद्मश्री’ने गौरविण्यात आले आहे.

भारतीय ॲथलेटिक्स महासंघाची नवीन कार्यकारिणी

  • अध्यक्ष: बहादूरसिंग सागू
  • वरिष्ठउपाध्यक्ष: अंजू बॉबी जॉर्ज
  • उपाध्यक्ष- अबू मेथा, जयंत मल्ला बारुह, ए. के. शर्मा.
  • सचिव: संदीप मेहता
  • कोषाध्यक्ष: स्टॅनली जोन्स
  • कार्यकारिणीसदस्य : सुधासिंग, हरजिंदरसिंग गिल, शारदादेवी जदम, प्रियांका भानोत, रचिता मिस्त्री, ए. राजावेलू, के. सारंगपाणी.

भारतीय ॲथलेटिक्स महासंघ:

  • ॲथलेटिक्सफेडरेशन ऑफ इंडिया ही भारतातील ॲथलेटिक्स खेळाची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे आणि ती देशातील स्पर्धा आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे.
  • स्थापना: 1946
  • मुख्यालय: नवीदिल्ली
  • माजीअध्यक्ष: आदिल सुमरिवाला

 ज्यूँ मारी  पेन यांचे निधन

  • फ्रान्समधीलअतिकडव्या गटाच्या राष्ट्रीय आघाडीचे संस्थापक ज्यूँ मारी ल पेन यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले.
  • बहुसांस्कृतिकतावादआणि स्थलांतरितांना त्यांचा प्रखर विरोध होता.
  • त्यांच्याया भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थक पाठिराखे आणि विरोधकही लाभले.
  • लपेन हे फ्रान्सच्या राजकारणामधील ध्रुवीकरण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध होते.
  • ज्यू-विरोध, भेदभावाचीवर्तणूक आणि वांशिक हत्यांना प्रवृत्त करण्यासाठी ते अनेकदा दोषी ठरले. मात्र, असे असूनही फ्रान्समध्ये ते लोकप्रिय होते.
  • ‘फ्रेन्चपीपल फर्स्ट’ घोषणांमधून यांसारख्या त्यांची विचारधारा आजही फ्रान्स आणि युरोपातील इतर देशांत वाढताना दिसत आहे.
  • प्रलयसंकल्पनेचा नकार मुस्लिमांची आणि स्थलांतरितांची वर्णद्वेषी निंदा, 1987मधील एड्स झालेल्या व्यक्तींना जबरदस्तीने विलग ठेवण्याचा प्रस्ताव यांसारख्या त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांच्या टीकाकारांनाही एके काळी धक्के बसले होते.
  • 2002मध्येअध्यक्षपदाच्या शर्यतीत ते होते. त्यांची मुलगी मरीन ल पेन यांनी वडिलांच्या विचारांपासून फारकत घेऊन ‘नॅशनल फ्रंट’ या पक्षाच्या नावातही बदल केले. आता हा पक्ष ‘नॅशनल रॅली’ या नावाने ओळखला जातो.

राहीबाई पोपेरे यांना ‘निसर्गमित्रपुरस्कार

  • अखिलभारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, निसर्गसेवक  आणि लेखक मारुती चितमपल्ली यांच्या सन्मानार्थ अॅडव्हेंचर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘मारुती चितमपल्ली निसर्गमित्र पुरस्कार’ अकोले येथील बीजमाता राहीबाई पोपेरे यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • पर्यावरण, वन्यजीवव निसर्गसेवा या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निसर्गमित्रांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
  • 2025 हेया पुरस्काराचे 17 वे वर्ष आहे.
  • सगळीकडेहायब्रीडचे विषारी वाण शेतीत पसरले असताना देशी गावरान बियांचा संग्रह करून पारंपरिक चालत असलेली शेती वाचविण्याचा प्रयत्न पोपेरे यांनी केला आहे.
  • गावोगावीजशा पैशाच्या बँका आहेत, तसेच अस्सल गावरान बियाण्यांच्याही बँका तयार झाल्या पाहिजेत, असा प्रयत्न राहीबाई पोपेरे यांनी केला आहे.
  • त्यांच्याया कामाची दखल घेत त्यांना अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *