मणिपूरमधील हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने चौकशी आयोग नेमला आहे.
गुवाहाटी उच्च नायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती अजय लांबा या आयोगाचे प्रमुख असतील.
माजी सनदी अधिकारी हिमांशू शेखर दास आणि निवृत्त आयपीएस अधिकारी अलोका प्रभाकर हे आयोगाचे अन्य सदस्य आहेत.
हिंसाचार घडण्याचे आणि तो पसरण्यामागील कारण शोधण्यासाठी चौकशी करण्याची जबाबदारी या आयोगावर आहे.
हिंसाचारादरम्यान घडलेल्या घटनांचा अभ्यास करण्याबरोबरच प्रशासकीय पातळीवर घटना हाताळणीत काही चूक झाली असल्यास त्यांची ही नोंद घेतली जाणार आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या तक्रारींचा अभ्यास आयोग करणार आहे .
आयोगाची पहिली बैठक झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत हा अहवाल सादर करायचा आहे.
हिंसाचाराचे कारण:
मैतेई समाजाने अनुसूचित जाती जमाती प्रवर्गांमधून आरक्षणाची मागणी केल्यानंतर कुकी समाजाने त्याविरुद्ध आदिवासी मोर्चा काढला होता. त्यानंतर मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचार सुरू झाला होता. पुढील काही दिवस ही दंगल सुरू होती या हिंसाचारात 80 जणांचा बळी गेला होता.
हिंसाचाराची कारणे, प्रसार याबद्दल आयोग चौकशी करणारा असून या हिंसाचाराशी संबंधित घटना या हाताळताना प्रशासकीय पातळीवर, व्यक्तींकडून काही ढिलाई झाली का, कर्तव्यात कसूर झाली का याची चौकशी आयोग करणार आहे.


