Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट

 

  • दीड वर्षांपासून अधिक काळ हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • आरक्षणाच्या मुद्द्यावरून मैतेई आणि कुकी समाजात निर्माण झालेल्या संघर्षाचे रूपांतर जातीय हिंसाचारात झाले होते.
  • या हिंसाचारात आतापर्यंत अनेक लोकांचा बळी गेला असून हजारो लोक विस्थापित झाले आहेत.
  • चार दिवसांपूर्वीच एन. बीरेनसिंह यांनी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांची भेट घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नव्हता.
  • घटनेतील कलम 174(1) नुसार राज्यांच्या विधानसभांचे आयोजन अंतिम बैठकीच्या सहा महिन्यांच्या आत घेणे आवश्यक असते.
  • मणिपूर विधानसभेचे अखेरचे सत्र 12 ऑगस्ट 2024 रोजी झाले होते.
  • या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशन बोलावण्याची मुदत गेल्या आठवड्यात संपली होती.
  • अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या एक दिवस आधी बीरेनसिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल भल्ला यांनी हे अधिवेशन निलंबित केले होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *