- मनू भाकरने सरबज्योत सिंगच्या साथीने 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील मिश्र सांघिक गटात कांस्यपदक मिळवत भारताच्या खात्यात आणखीन एका पदकाची भर घातली.
- स्वातंत्र्योत्तर काळात एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके मिळवण्याची किमया मनूने साधली आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली.
- यापूर्वी स्वतंत्र्यपूर्वकाळात 1900 मध्ये नॉर्मन पीचार्ड या धावपटूने 200 मीटर आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदकाची कमाई केली होती.
- भारताचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता म्हणून त्याचेच नाव घेतले जाते.
- ऑलम्पिक स्पर्धेत दोन पदके मिळविणारी मनू भाकर ही भारताची एकूण तिसरी खेळाडू ठरली आहे.
- याआधी अशी कामगिरी कुस्तीगीर सुशीलकुमार याने 2008 (कांस्य)आणि 2012(रौप्य) च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले होते .
- तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ने 2016 (रौप्य) आणि 2020(कांस्य) च्या ऑलम्पिक स्पर्धेत पदक जिंकलेले आहे.
सरबज्योत सिंग:
- हरियाणा, अंबाला येथील धिन या गावात सरबज्योतचा जन्म
- 2022 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सांघिक गटात सुवर्ण आणि मिश्र गटात रौप्य
- 2023 मध्ये कोरियातील अशियाई अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात कांस्य आणि ऑलिंपकसाठी पात्रता
- 2023 मध्ये भोपाळ येथील विश्वकरंडक स्पर्धेत वैयक्तिक प्रकारात सुवर्णा
- 2023 बाकू येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत मिश्र दुहेरीत सुवर्ण
- 2022 मध्ये ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत सांघित गटात सुवर्ण तसेच वैयक्तिक आणि मिश्र गटात दोन रौप्य
- 2021 मध्ये लिमा येथील ज्युनियर विश्वकरंडक स्पर्धेत सांघिक आणि मिश्र दुहेरीत सुवर्णपदके.