बलात्कार लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सध्याच्या मनोधैर्य योजनेमध्ये सुधारणा करून यापुढे पेट्रोल, डिझेल ,रॉकेल, स्वयंपाकाचा गॅस अशा ज्वालाग्रही पदार्थांच्या हल्ल्यातील महिलांना देखील पुनर्वसन करण्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अन्य ज्वालाग्रही पदार्थांच्या हल्ल्यातील महिलांना देखील पूर्ण अपंगत्व आल्यास दहा लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात येईल.


