सहजतेने मिळणाऱ्या मशरूमच्या विस्तृत श्रेणीतून नैसर्गिक संसर्गविरोधी, विषाणूविरोधी ,दाह-विरोधी आणि अँटीथ्रोम्बोटिक घटकांचा म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या कमी करण्याचा सामना करण्याची क्षमता आहे, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे.
अधिक माहिती
• कोविड-19 महामारीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या जैव सक्रिय घटकांवर लक्ष केंद्रित केले. परिणामी, जगभरातील शास्त्रज्ञांनी जैव सक्रिय संयुगांवर सखोल अभ्यास पुन्हा सुरू केला ज्यामुळे सार्स -सीओव्ही -2 पासून संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि या विषाणूचा वेगवान प्रसार मर्यादित होतो.
• परिणामी, मशरूमची सहज उपलब्धता, उच्च अँटिऑक्सिडंट गुणधर्म, पौष्टिक मूल्य आणि कमी दुष्परिणामांमुळे हर्बल स्रोत असलेल्या आणि खाद्य म्हणून वापरण्यात येणाऱ्या तसेच जैव सक्रिय संयुगे असलेले मशरूम व्यावसायिक स्वारस्य मिळवत आहेत.
• मशरूम हे खाद्यपदार्थांचा लोकप्रिय स्त्रोत आहेत आणि ईशान्य भारतात विविध प्रकारचे मशरूम्स उपलब्ध आहेत.
• मशरूमच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे, कोविड-19 आणि इतर विषाणूजन्य संसर्गाविरूद्धच्या गुंतागुंत कमी करण्यासाठी खाण्यायोग्य मशरूम आणि मशरूममधील नैसर्गिक संयुगे यांच्या महत्त्वाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगत अभ्यास संस्था (आयएएसएसटी ) या स्वायत्त संस्थेतील संशोधकांनी महत्वाचे विश्लेषण केले.
संशोधकांच्या मते
• मशरूममध्ये जैवसक्रीय बहुशर्करा (पॉलिसेकेराइड्स) आणि रोगप्रतिकारक शक्तीवर प्रभावी इम्युनोमोड्युलेटिंग, विषाणूविरोधी, जिवाणूविरोधी, बुरशीविरोधी आणि इतर औषधी गुणधर्म असलेली संयुगे असतात. त्यात असेही म्हटले आहे की, सार्स सीओव्ही – 2 विरुद्ध आशादायक परिणामांसह मशरूम-आधारित औषधांची मानवी चाचणी केली जात आहे.
• विषाणूजन्य संसर्गाविरूद्ध खाण्यायोग्य मशरूम वापरण्याचे मुख्य फायदे आहेत ते म्हणजे कोणतेही दुष्परिणाम नसलेले हे पोषक पूरक अन्न असून रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे म्हणून मशरूमचा वापर केला जाऊ शकतो.