Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महाराष्ट्रात महायुतीचा विजय

महाराष्ट्रात महायुतीचा विजय

महाराष्ट्रात महायुतीचा विजय

  • विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांपेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार विजय संपादन केला.
  • 288 पैकी तब्बल 235 जागा जिंकून महायुतीने महाविकास आघाडीचा पराभव केला.
  • एकट्या भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाला.
  • शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांचा पराभव केला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024

  • भारतीय जनता पक्ष – 132
  • शिवसेना/ शिंदे – 57
  • राष्ट्रवादी/अजित पवार – 41
  • शिवसेना/ठाकरे गट – 20
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – 16
  • राष्ट्रवादी/शरद पवार गट – 10
  • इतर – 10
  • अपक्ष – 02
  • एकूण जागा – 288
  • बहुमत – 144+1

महाराष्ट्र 15 वी विधानसभा 2024 आढावा

  • 15 वी विधानसभा निवडणूक
  • एकूण जिल्हे : 36
  • एकूण मतदारसंघ : 288
  • सर्वसाधारण मतदारसंघ : 234
  • SC मतदारसंघ : 29
  • ST मतदारसंघ : 25
  • एकूण उमेदवार : 4136 उमेदवार
  • एकूण पक्ष उमेदवार : 158 पक्ष आहेत
  • एकूण अपक्ष उमेदवार : 2086 उमेदवार
  • मतदान केंद्र : 1 लाख 183
  • एकूण मतदार : 9,70,25,119
  • पुरुष मतदार : 5,00,22,739
  • महिला मतदार : 4,69,96,279
  • तृतीयपंथीय मतदार : 6,101
  • नवीन मतदार : 20 लाख 93 हजार
  • तरूण मतदार : 1.85 कोटी
  • अपंग मतदार : 6.36 लाख
  • एकूण मतदान केंद्रे : 1,00,186
  • शहरी केंद्रे : 42602
  • ग्रामीण केंद्र : 57558राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी : 66.05%.
  • सर्वाधिक मतदान करवीर येथे 96%.
  • सर्वात कमी मतदान : कुलाबा येथे 44%.
  • एकूण प्रत्यक्ष मतदान : 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी सहभाग घेतला.
  • पुरुष मतदारांचे मतदान : 3 कोटी 34 लाख 37 हजार
  • महिला मतदारांचे मतदान : 3कोटी 6लाख 49 हजार
  • इतर मतदान : 1 हजार

झारखंडमध्ये मुक्ती मोर्चाचेवर्चस्व

  • हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने पुन्हा एकदा झारखंडमधील सत्ता कायम राखली आहे.
  • 81 सदस्य असलेल्या विधानसभेत त्यांच्या पक्षाला 34 जागांवर यश मिळाले असून ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेसने 16 आणि राष्ट्रीय जनता दलाने 4 जागा जिंकल्या आहेत.
  • त्यामुळे झारखंडमध्ये आघाडीचे सरकार कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले असताना भाजप 21 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.

पक्षनिहाय जिंकलेल्या जागा

1) झामुमो 34

2) भाजप 21

3) काँग्रेस 16

4) राजद 04

5) इतर 06

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024

  • 55 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2024 या कालावधीत पणजी , गोवा येथे होत आहे.

2024 च्या महोत्सवाची थीम

  • यंग फिल्ममेकर्स द फ्युचर इज नाऊआहे, त्यामुळे तरुण रक्ताला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षी फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट डेब्यू डायरेक्टर ऑफ इंडियन फीचर फिल्म’ हा नवीन विभाग आणि पुरस्कार श्रेणी सादर करण्यात आली आहे.
  • भारतातील तरुण दिग्दर्शकीय प्रतिभेची ओळख म्हणून या पुरस्कारामध्ये प्रमाणपत्र आणि ₹ 5 लाखांचे रोख पारितोषिक असते.
  • महोत्सवात 15 जागतिक प्रीमियरसह 81 देशांतील 180 आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रदर्शित केले जातील.
  • या कार्यक्रमाची सुरुवात श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर प्रसिद्ध संस्कृत श्लोक ‘अच्युतम केशवम् राम नारायणम्’ या गीतानं झाली.
  • चित्रपट महोत्सवातील चित्रपटांच्या प्रदर्शनाची सुरुवात दिग्दर्शक मायकेल ग्रेसीच्या जगभरात गाजलेल्या ‘बेटर मॅन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानं झाली.

 डॉ. माशेलकर यांना मानद डॉक्टरेट

  • शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन अकादमीच्या आठव्या पदवी प्रदान सोहळ्यात केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान व भूगर्भशास्त्र मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करून नुकतेच गौरविण्यात आले.
  • डॉ. माशेलकर यांची ही 50 वी मानद डॉक्टरेट असून, ऑस्ट्रेलिया येथील डीकिन विद्यापीठाने माशेलकर यांना त्यांची 49 वी मानद डॉक्टरेट नुकतीच प्रदान केली.
  • डॉ. माशेलकर हे देशातील सर्वाधिक मानद डॉक्टरेट असणारे अभियंता ठरले आहेत. त्यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा विक्रम मोडला आहे.

जंगल महाल उत्सव

  • पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात सध्या जंगल महाल उत्सव सुरू झाला आहे.
  • यात स्थानिक कलावंतांकडून विविध कला सादर केल्या जातात.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *