Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

महालेखापरीक्षकपदी मूर्ती यांची नियुक्ती

महालेखापरीक्षकपदी मूर्ती यांची नियुक्ती

जागतिक बाल दिन

  • या दिवसाचा उद्देश जागतिक एकात्मतेला प्रोत्साहन देणे, मुलांच्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांचे संपूर्ण कल्याण सुधारणे हा आहे.
  • जागतिक बालदिन 2024 ची थीम “आमच्या मुलांमध्ये गुंतवणूक करणे ही आपल्या भविष्यात गुंतवणूक आहे.”

इतिहास:

  • जागतिक बाल दिन साजरा करण्याची सुरुवात 1954 साली झाली.
  • 20 नोव्हेंबर 1954 ला पहिल्यांदा सार्वत्रिकरित्या बाल दिन साजरा करण्यात आला. त्याला सुरुवातीला युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे असं संबोधण्यात आलं.
  • त्यानंतर 1959 मध्ये युनायटेड नेशन्स असेंब्लीने बाल हक्कांविषयी चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनाचा वर्धापन दिन बाल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्व:

  • जगभरातील मुलांचं कल्याण व्हावं यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जागतिक बाल दिनाच्या निमित्ताने केला जातो.
  • मुलांच्या हक्कांविषयी जागरुकता पसरवणे आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न करणे हा जागतिक बाल दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
  • अनेक आंतरराष्ट्रीय संघटना मुलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम करत आहे.
  • युनिसेफदेखील लहान मुलांचा विकास होण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे.
  • राष्ट्रीय बाल दिन 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.

भारताच्या दूरसंचार उपग्रहाचे अमेरिकेतून यशस्वी प्रक्षेपण

  • देशाचा नवा ‘जीसॅट-एन 2’ हा दूरसंचार उपग्रह अमेरिकेतील केप कनाव्हरल येथून ‘स्पेस-एक्स’च्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले.
  • ‘इस्रो’च्या ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ अर्थात ‘एनएसआयएल’ ने ही माहिती दिली.
  • दूरसंचार उपग्रहामुळे ब्रॉडबँड सेवा अधिक चांगली होणार असून, भारताच्या कुठल्याही हवाई भागात विमानामध्येही इंटरनेटचा वापर करता येणार आहे.
  • एखादा उपग्रह अवकाशात सोडण्यासाठीची यंत्रणा ‘इस्रो’कडे होती. मात्र, ‘जीसॅट-एन 2’ उपग्रह वजनाने जास्त होता आणि  इस्रोकडे या वजनाचा उपग्रह अवकाशात सोडण्याची  सुविधा नव्हती त्यामुळे परदेशातून उपग्रहाला अवकाशात सोडावे लागल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
  • इस्रोचे माजी अध्यक्ष के सीवन यांनीही अधिक वजनामुळे परदेशातून उपग्रह अवकाशात सोडावा लागल्याची माहिती दिली.
  • उपग्रहाचे वजन 4700 किलो आहे.
  • इस्रो कडून अनेक यशस्वी मोहिमा पार पडल्यानंतर भारताचा जीसॅट एन 2 या महत्त्वकांक्षी दूरसंचार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यासाठी अमेरिकेतील स्पेसेक्स ची मदत घेण्यात आली आहे.

उपग्रहाची वैशिष्ट्ये

  • इंटरनेटचा मोठा खरेदीदार वर्गाला उपयुक्त ठरेल, असे उपग्रहात तंत्रज्ञान, अनेक ‘स्पॉट बीम्स’ आणि केए 7 केए ट्रान्सपॉडर्स
  • उपग्रहाचे कार्य 14 वर्षांचे असून, त्यात 32 ‘यूझर बीम’चा समावेश आहे.
  • ईशान्य भारतासाठी 8 छोटे ‘स्पॉट बीम्स’ आणि उर्वरित भारतासाठी 24मोठे ‘स्पॉट बीम्स’ असतील.
  • भारतातील विविध ठिकाणी असलेल्या हब स्टेशन्समधून 32 ‘बीम्स’ना उपयुक्त ठरेल असे सहाय्य केले जाणार.

मागणीवर आधारित दुसरा उपग्रह

  • या उपग्रहामुळे भारताच्या सर्व भागात ब्रॉडबँड सेवा अधिक चांगली होणार आहे आणि विमानातही इंटरनेटला चांगली रेंज येऊ शकेल.
  • ‘एनएसआयएल’चा ‘जीसॅट-24’ हा पहिला मागणीवर आधारित अर्थात ‘डिमांड ड्रिव्हन’ उपग्रह होता.
  • हा उपग्रह फ्रेंच गयानातील कौरौ येथून 23 जून 2022 रोजी सोडण्यात आला.

महालेखापरीक्षकपदी मूर्ती यांची नियुक्ती

  • देशाचे महालेखापरीक्षक म्हणून केंद्र सरकारने हिमाचल प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची आज नियुक्ती केली.
  • ते 15 वे महालेखापरीक्षक असतील.
  • त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत असेल.
  • भारताचे विद्यमान CAG गिरीश चंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर रोजी संपत आहे.
  • ऑगस्ट 2020 मध्ये मुर्मू यांची CAG म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याआधी मुर्मू हे जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते.
  • के संजय मूर्ती सध्या शिक्षण मंत्रालयात उच्च शिक्षण विभागाचे सचिव आहेत.
  • संजय मूर्ती हे हिमाचल प्रदेश केडरचे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

भारताचे नियंत्रक व महालेखापाल(CAG-Comptroller and Auditor General of India

  • भारताचे नियंत्रक व महालेखापाल हे भारत सरकारचा जमाखर्च तपासण्याची घटनात्मक अधिकार आसलेले नियंत्रक व महालेखापाल पद आहे.
  • हे पद भारतीय घटनेच्या कलम 148 नुसार निर्माण केले आहे.
  • केंद्र व राज्य सरकारचे जमा आणि खर्चाचे ऑडिट करून रिपोर्ट भारतीय संविधानाने नेमलेल्या पब्लिक अकाऊंट समितींना सादर करण्यात येतो.

अरुणाचलमध्ये संयुक्त सराव

  • अरुणाचल प्रदेशमधील शी-योमी जिल्ह्यात लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्त सराव केला.
  • ‘पूर्वी प्रहार’ नावाच्या या चार दिवसांच्या सरावात गुप्तचर विभागाकडून माहिती घेणे, पाळत ठेवणे, वेगाने जमवाजमव करणे आदी कृती संयुक्तपणे करण्यात आल्या.
  • सरावात एम- 777, हॉवित्झर तोफेसह पी-8आय विमान, ड्रोन, ‘चिनूक’ व ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरनी सहभाग घेतला होता.
  • लष्करी पराक्रमाचे महत्त्वपूर्ण प्रदर्शन करताना, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायुसेनेने संयुक्तपणे अरुणाचल प्रदेशच्या अग्रेषित भागात पूर्वी प्रहार हा उच्च-तीव्रतेचा त्रि-सेवा सराव केला .
  • 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सराव 18 नोव्हेंबर रोजी संपला आणि जवळपास वास्तविक लढाऊ परिस्थितींमध्ये त्यांचे अतुलनीय युद्ध कौशल्य प्रदर्शित केले.
  • या मोठ्या प्रमाणावरील संयुक्त सरावाचे उद्दिष्ट लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या लढाऊ परिणामकारकतेला सन्मानित करण्याच्या उद्देशाने या प्रदेशातील आव्हानात्मक पर्वतीय भूभागात एकात्मिक संयुक्त ऑपरेशन्स राबविणे, आंतर-सेवा समन्वय आणि ऑपरेशनल तत्परता वाढवणे.
  • या सर्वसमावेशक सरावाने गुप्तचर माहिती गोळा करणे, पाळत ठेवणे, टोही करणे, जलद जमाव करणे, तैनाती/पुनर्नियोजन आणि ऑपरेशनल लॉजिस्टिकमध्ये संयुक्त संरचनांची प्रभावीता दर्शविली.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *