महिला टी -20 विश्वचषकाचे न्यूझीलंडला विजेतेपद
- न्यूझीलंडच्यामहिला संघाने पहिल्यांदाच टी- ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा जिंकताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर 32 धावांनी मात केली. याआधी न्यूझीलंडने 2009 आणि 2010 च्या टी -20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली होती.
- दुबईअंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये अंतिम लढत पार पडली.
- 2024 चीस्पर्धा संयुक्त अरब अमिराती मध्ये आयोजित करण्यात आली होती.
टी-20 स्पर्धा – 2024
- स्पर्धा: 9 वी
- विजेता: नुझीलंड
- उपविजेता: द. आफ्रिका
- अंतिमसामना : दुबई
- सहभागीसंघ: 10
- सामने: 23
- प्लेअरऑफ द सिरीज : एमिला किर(नुझीलंड)
- सर्वाधिकधावा: लॉरा ओलव्हार्डट(223, द. आफ्रिका)
- सर्वाधिकबळी : एमिला किर (15, न्याझीलंड)
- पहिलीस्पर्धा : 2009
- आगामीस्पर्धा(10 वी) : इंग्लंड
- सर्वाधिकवेळा विजेतेपद : ऑस्ट्रेलिया (6 वेळा)
कॉक्ससॅकी विषाणू
- मुंबईतकॉक्ससॅकी हा संसर्गजन्य आजार वेगाने पसरत आहे.
- याविषाणूमुळे चिकनपॉक्सप्रमाणे हात, पाय आणि तोंडावर पुरळ उमटत असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले.
- साधारणपणेलहान मुलांना होणाऱ्या कॉक्ससॅकी व्हायरसमध्ये अनेकवेळा बाधित मुलांना चिकनपॉक्ससारखी लक्षणे दिसून येतात, मात्र प्रत्यक्षात हा विषाणू लहान मुलांना अधिक प्रभावित करतो. आजारादरम्यान ताप,घसा खवखवणे आणि हात, पायासह तोंडावर लहान फोड किंवा पुरळ येतात.
- हेफोड वेदनादायक अल्सरमध्ये बदलत असल्याने मुलांना खाण्यापिण्यातही त्रास होतो, तसेच खोकला, शिंकणे किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरत आहे.
- कॉक्ससॅकीए विषाणू ( सीएव्ही ) हा पिकोर्नविरिडे कुटुंबातील सायटोलाइटिक कॉक्ससॅकी विषाणू आहे.
आजाराची प्रमुख लक्षणे
- विषाणूची लक्षणे दिसण्यासाठी सुमारे 36 दिवस लागतात.
- बऱ्याचदाविषाणूमुळे रुग्णाला पुरळ आणि ताप येतो.
- चिकनपॉक्समध्येरुग्णाच्या छाती, पाठीवर फोड येतात, तसेच अतिसार आणि पोटात अस्वस्थता ही लक्षणे आढळतात, तर कॉक्ससॅकीमुळे बोटे, तळवे, गुडघे, नितंब, हातआणि शरीराच्या सांध्यामध्ये फोड येतात.
- पीसीआर चाचणीनंतर आजाराचे निदान होते.
- बर्फ किंवा सिरपने अस्वस्थता कमी करू शकते, तसेच नियमित हात स्वच्छ केल्याने संसर्ग टाळता येतो.
नरेंद्र बोरगावकर यांचे निधन
- विधानपरिषदेचेमाजी आमदार, राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष नरेंद्र बाबूराव बोरगावकर (वय 87) यांचे निधन झाले.
- विधानपरिषदेचेआमदार म्हणून 1995 ते 2001 पर्यंत त्यांनी काम केले.
- शैक्षणिक, सामाजिक, राजकीयक्षेत्रांत ते मागील 62 वर्षांपासून कार्यरत होते.
- तुळजापूरपंचायत समितीचे ते पहिले सभापती होते.
इंडोनेशियाच्या अध्यक्षपदी सुबियांतो
- प्रबोवोसुबियांतो यांनी इंडोनेशियाचे आठवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
- इंडोनेशियाचीराजधानी जकार्ता येथे झालेल्या या शपथविधी सोहळ्याला 40 हून अधिक देशांचे नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय हवाई दल आणि सिंगापूरचे हवाई दल यांच्यातील सरावाला प्रारंभ
- भारतीयहवाई दल आणि सिंगापूरचे हवाई दल यांच्यातील 12 व्या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला 21ऑक्टोबर 2024 रोजी, पश्चिम बंगालच्या कलाईकुंडा येथील हवाई दलाच्या तळावर सुरुवात झाली.
- हाद्विपक्षीय सरावाचा दुसरा टप्पा 13 ते 21 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आयोजित केला जाईल.
- याअंतर्गत दोन्ही दलांमध्ये प्रगत हवाई लढाऊ तंत्र, संयुक्त मोहिमांचे नियोजन आणि माहितीपूर्ण सत्रांमध्ये घनिष्ट सहकार्य वृद्धिंगत होऊन घनिष्ठ सहकार्य वाढीला लागण्याची अपेक्षा आहे.
- आंतरकार्यक्षमतावाढवणे, युद्ध सज्जतेत वाढ आणि दोन हवाई दलांमधील सर्वोत्तम पद्धतींसंदर्भातील ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हे या द्विपक्षीय टप्प्याचे उद्दिष्ट आहे.
- सिंगापूरचेहवाई दल आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीसह या लष्करी सरावात भाग घेत असून त्यामध्ये F-16, F-15 स्क्वॉड्रन मधील विमान क्रू आणि सहाय्यक कर्मचारी आणि G-550 एअरबोर्न अर्ली वॉर्निंग अँड कंट्रोल (AEW&C) आणि C-130 विमानांचा समावेश आहे. तर भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात राफेल, मिराज 2000 ITI, Su-30 MKI, तेजस, मिग-29 आणि जग्वार विमानांचा समावेश आहे.
- संयुक्तलष्करी सराव त्याच्या आरंभापासूनच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय करारांच्या कक्षेत घेतला जातो.
- भारतीयहवाई दलाने आयोजित केलेल्या तरंग शक्ती या सर्वात मोठ्या बहुराष्ट्रीय हवाई कवायतींमध्ये सिंगापूरच्या हवाई दलाने सहभाग घेतला होता आणि आता त्यापाठोपाठ संयुक्त लष्करी सराव देखील आयोजित करण्यात आला आहे.
- तरंगशक्ती हे दोन हवाई दलांमधील वाढत्या व्यावसायिक संबंधाचे प्रतिबिंब आहे.
- हवाईसंचालना व्यतिरिक्त, दोन्ही हवाई दलांचे कर्मचारी सर्वोत्तम सराव पद्धतींची देवाणघेवाण करतील, आणि पुढील सात आठवड्यांच्या कालावधीत अनेक क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधतील.
संयुक्त लष्करी प्रशिक्षण -2024 मध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यातील अनेक वर्षांचे सहकार्य, संयुक्त सराव, तसेच परस्परांप्रती असलेल्या आदरभावातून निर्माण झालेल्या मजबूत द्विपक्षीय संरक्षण संबंध अधोरेखित करण्यात आले आहेत.