माजी कसोटीपट्टू अबीद अली यांचे निधन
- भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू सय्यद अबीद अली यांचे प्रदीर्घ आजाराने अमेरिकेत वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.
- अबीद अली यांनी 1967 मध्ये अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले.
- पहिल्याच कसोटीत त्यांनी पहिल्या डावात 55 धावांत 6 गडी बाद केले.
- कारकीर्दीत त्यांची हीच सर्वोत्तम कामगिरी ठरली.
- यानंतर सिडनी कसोटीत अबीद यांनी 78 आणि 81 धावा करताना फलंदाजीतील आपले कौशल्य सिद्ध केले.
- मन्सूर अली खान पतौडी, एम. एल. जयसिंहा, अब्बास अली बेग, अबीद असे हैदराबादचे क्रिकेटपटू त्या काळी भारतीय संघाचे प्रमुख सदस्य होते.
- 1967 ते 1974 या कालावधीत अबीद 29 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 1018 धावा केल्या आणि 47 गडी बाद केले.
- अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली अबीद 1974 मध्ये हेडिग्ली येथे पहिला एकदिवसीय सामना खेळले.
- त्यानंतर 1975 च्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी तीन सामने खेळले. न्यूझीलंडविरुद्ध 98 चेंडूंत 70 ही त्यांची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी होती.
- अबीद यांनी आंध्र प्रदेश संघाचे प्रशिक्षकपद भूषविले.
- अमेरिकेतील वास्तव्यात त्यांनी उत्तर अमेरिका आणि बे एरिया येथील क्रिकेटच्या विकासासाठी अथक प्रयत्न केले.
- क्रिकेट वर्तुळात ते ‘चिच्चा ‘ म्हणून ओळखले जात.