Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान |LIFETIME ACHIEVEMENT AWARD GIVEN TO FORMER CHIEF JUSTICE UDAY LALIT

  • Home
  • Current Affairs
  • माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान |LIFETIME ACHIEVEMENT AWARD GIVEN TO FORMER CHIEF JUSTICE UDAY LALIT

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 2023 चा प्रतिष्ठेचा आणि मानाचा जीवनगौरव पुरस्कार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश उदय उमेश लळीत यांना प्रभारी कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी प्रदान केला.

● पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात.
● सोलापूर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी आणि ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो.
● विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी लळीत यांना विनंती केली होती, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली.

पुरस्काराचे स्वरूप:

● रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
1 ऑगस्ट 2023 रोजी विद्यापीठाचा 19 वा वर्धापन दिन समारंभ साजरा झाला
● सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी कुलगुरू डॉ. कामत यांच्या हस्ते पार पडला.
● पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे ब्रीदवाक्य :- “विद्यया संपन्नता”

इतर पुरस्कार:-

उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: एन. बी. नवले, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर
उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार : प्राचार्य डॉ. शंकर नवले, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर, प्राचार्य डॉ. राजशेखर हिरेमठ, श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सोलापूर
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ): डॉ. रवींद्र चिंचोलकर, सामाजिकशास्त्रे संकुल, डॉ. राजीवकुमार मेंते, संगणकशास्त्र संकुल
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, डी. बी. एफ. दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर, प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर
उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार: डॉ.अभिजीत जगताप, वैद्यकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. उमराव मेटकरी, उपकुलसचिव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *