- स्पेनच्या मानोलो मार्केझ यांची भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- ते इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) क्लब एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदही कायम राहतील.
- ‘एआयएफएफ’च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत नवे प्रशिक्षक म्हणून मार्केझ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
- मार्केझ यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असेल हे स्पष्ट करण्यात आले नाही.
- भारतीय संघाला 2026 च्या विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळवण्यात अपयश आल्यानंतर इगोर स्टिमॅच यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.
- मार्केझ 2020 सालापासून भारतात प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत.
- त्यांनी प्रथम हैदराबाद एफसी क्लबला (2020-23) मार्गदर्शन केले. या काळात हैदराबाद संघाने ‘आयएसएल’ चषक पटकावला होता.
- मार्केझ यांनी 2023 मध्ये हैदराबाद संघ सोडून गोवा एफसीचे प्रशिक्षकपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला.