- राष्ट्रीय व राज्यस्तरावरील विविध योजना यशस्वीपणे राबवणारे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी राज्यातील पहिले सौरग्राम होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
- सध्या गावातील प्रत्येक घरावर सौरऊर्जानिर्मितीची यंत्रणा बसवली जात असून, येत्या 10 ऑगस्टपूर्वी हे काम पूर्ण होणार आहे.
- राज्य व केंद्र शासनाकडून अपारंपरिक ऊर्जानिर्मितीस प्रोत्साहन असल्याची संधी घेण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला.
- त्यानुसार प्रत्येक मिळकतदाराने ‘ऑनग्रीड सौरऊर्जानिर्मिती’ची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली.
- गावात मान्याचीवाडीमध्ये शंभर किलोवॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारला जात आहे.
- यातून रोज पाचशे युनिट विजेची निर्मिती होणार आहे.
- गावाची गरज सध्या तीनशे युनिट असून, उर्वरित दोनशे युनिट विजेची महावितरणला विक्री केली जाणार आहे.
- टाटा सोलर पावर कंपनीचे सन्मित्र सोलर एनर्जीच्या माध्यमातून दहा तंत्रज्ञ, कर्मचारी हा प्रकल्प उभारत आहेत.
वीज दरवाढीला कायमस्वरूपी पर्याय..
- घर तिथे एक किलोवॉट, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडीसाठी पाच किलोवॉट तर विहिरींवर चार किलोवॉटचा स्वतंत्र सौर ऊर्जा प्रकल्प असणार आहे.
- त्यातून ऊर्जा उत्सर्जन, कार्बन न्युट्रल, च्या मदतीसह वीज दराच्या सततच्या दरवाढीला कायमस्वरूपी पर्याय मिळाला आहे.
दोन ‘गगनयात्री‘ अवकाशात झेपावणार
- भारताच्या गगनयान मोहिमेसाठी निवड झालेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर यांची आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (आयएसएस) जाणाऱ्या ‘अॅक्सिऑम 4’ या आंतरराष्ट्रीय अवकाश मोहिमेसाठी अधिकृत निवड झाली आहे.
- या मोहिमेत शुक्ला यांच्याकडे कॅप्टनची जबाबदारी असून, नायर हे राखीव कॅप्टन म्हणून मोहिमेत सहभागी असतील.
- विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर तब्बल चार दशकांनी भारताचे नागरिकत्व असणारी व्यक्ती शुक्ला यांच्या रूपाने अवकाशात झेपावणार आहे.
- या दोघांनाही ‘गगनयात्री’ असे संबोधण्यात आले आहे.
- 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या दरम्यान इस्रो आणि अमेरिकी अवकाश संशोधन संस्था नासाच्या संयुक्त अवकाश मोहिमेची घोषणा करण्यात आली होती त्याला अनुसरून नासाशी व्यवसायिकरित्या संलग्न असलेल्या अॅक्सिऑम स्पेस या कंपनीसोबत इस्रोचा ह्यूमन स्पेस फ्लाईट सेंटरने ‘अॅक्सिऑम 4’ या मोहिमेसाठी अवकाश प्रवासाचा करार केला.
- भारताच्या नॅशनल मिशन असाइनमेंट बोर्डाने या मोहिमेसाठी शुक्ला यांची प्रमुख कॅप्टन म्हणून निवड केली असून राखीव कॅप्टन म्हणून नायर यांचा सहभाग असेल.
अशी असेल ‘अक्सिऑम 4′ मोहीम
- ‘अॅक्सिऑम 4′ ही मोहीम चालू वर्षाअखेरपासून ते 2025 मध्ये राबवण्यात येऊ शकते.
- स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन नऊ रॉकेटच्या साह्याने क्रू ड्रॅगन अवकाश यानामार्फत ही मोहीम पार पडेल.
- या मोहिमेतून भारतीय गगनयात्रींना गगनयान मोहिमेआधीच अवकाश प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.
- 14 दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात विविध वैज्ञानिक प्रयोग करणार असून, तंत्रज्ञानांची तपासणी आणि अवकाश तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसारही करतील.