Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ रॉकेट भारतीय नौदलाकडे सुपूर्द

  • Home
  • Current Affairs
  • मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ रॉकेट भारतीय नौदलाकडे सुपूर्द
  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) 26 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या समारंभात मध्यम पल्ल्याचे -मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ रॉकेट (एमआर-एमओसीआर) भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले.
  • मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ (एमओसी) हे डीआरडीओ च्या जोधपूरमधील संरक्षण प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेले एक सूक्ष्मलहरी प्रतिगामी खास तंत्रज्ञान आहे.
  • याद्वारे रडार सिग्नल धूसर होऊन प्लॅटफॉर्म आणि मालमत्तेभोवती सूक्ष्मलहरींचे कवच तयार होते आणि शत्रूच्या रडारच्या कक्षेत येण्याचा धोका कमी होतो.
  • मध्यम पल्ल्याच्या चॅफ रॉकेटमध्ये काही मायक्रॉन व्यासाचे आणि अनोखे सूक्ष्मलहरी प्रतिगामी गुणधर्म असलेले विशेष प्रकारचे तंतू एकत्र केले गेले आहेत.
  • शत्रूकडून गोळीबार झाल्यावर हे रॉकेट निर्धारित काळासाठी आकाशात पुरेशा क्षेत्रावर सूक्ष्मलहरींचे धूसर ढग तयार करतो ज्याद्वारे ध्वनिलहरींचा शोध घेणाऱ्या प्रतिकूल धोक्यांपासून एक प्रभावी कवच तयार होते.
  • एमआर-एमओसीआरच्या टप्पा -1 चाचण्या भारतीय नौदलाच्या जहाजांवरून यशस्वीपणे पार पडल्या, ज्यामध्ये एमओसी द्वारे निर्धारित काळासाठी आकाशात ढग तयार करण्यात आले.
  • टप्पा -II चाचण्यांमध्ये, शत्रूच्या रडारच्या कक्षेत येऊन (आरसीएस) हवाई लक्ष्याच्या घटना 90 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे भारतीय नौदलाने दाखवून चाचणी यशस्वी केली आहे.
  • सर्व पात्र आवश्यकता पूर्ण करून अनेक मध्यम पल्ल्याची – मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॅफ रॉकेट यशस्वीरित्या भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *