भारताच्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एब्डनच्या साथीत मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत बोपण्णा-एब्डन यांनी इव्हान डॉडिग-ऑस्टिन क्रॅइचेक यांच्यावर 6-7 (3), 6-3, 10-6 अशी मात केली.
अधिक माहिती
• बोपण्णाचे हे मास्टर्स 1000 स्पर्धेतील एकूण सहावे आणि एब्डनच्या साथीत दुसरे जेतेपद ठरले.
• यापूर्वी, गेल्या मोसमात बोपण्णाने एब्डनच्या साथीत इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धा जिंकली होती.
• त्यानंतर माद्रिद, शांघाय आणि पॅरिस मास्टर्स स्पर्धांत या दोघांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.


