● पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीवच्या माले इथल्या आपल्या भेटीदरम्यान, मालदीवच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले.
● मालदीवच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याला भारतीय पंतप्रधानांनी उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तसेच, राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांनी आदरातिथ्य केलेले पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत.
● मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपब्लिक स्क्वेअर येथे झालेल्या स्वातंत्र्यदिन संचलनाची पाहणी केली. यावेळी, पंतप्रधानांनी मालदीवच्या लोकांना आणि सरकारला शुभेच्छाही दिल्या.
● स्वातंत्र्यदिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधानांची उपस्थिती, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधला एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
● 2025 या वर्षात भारत आणि मालदीव दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला 60 वर्षे पूर्ण झाली आहेत.