● संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था असलेल्या ‘युनेस्को’मधून बाहेर पडत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले.
● ही संस्था इस्रायलविरोधात पूर्वग्रह बाळगून असल्याचा आरोप करत अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने ‘युनेस्को’ मधून बाहेर पडण्याची ही तिसरी वेळ आहे.
● त्यापैकी दोन वेळा ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असताना हा निर्णय घेण्यात आला.
● सर्वात प्रथम १९८४मध्ये तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ‘युनेस्को’ वर गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि सोव्हिएत रशियाच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत बाहेर पडण्याची घोषणा केली होती.
● २०१७ मध्ये ट्रम्प यांनी या निर्ण्यची पुनरावृत्ती केली.