राज्याच्या माजी आरोग्य, समाजकल्याण राज्यमंत्री, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा अॅड. रजनी शंकरराव सातव यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्या काँग्रेसचे दिवंगत नेते अॅड. राजीव सातव यांच्या मातोश्री होत्या.
अधिक माहिती
• विधानसभेच्या 1980 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.
• आठ विभागांच्या उपमंत्री म्हणून त्यांनी तीन वर्षे कार्य केले.
• त्यानंतर 1985 च्या विधानसभेत त्या कळमनुरीमधून दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. या पुढच्या कार्यकाळात त्या विविध विभागांच्या राज्यमंत्री होत्या.
• यासोबतच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा, परिचारिका सेवा विषय समितीच्या अध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले.
• बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर, शंकरराव चव्हाण व शरद पवार अशा पाच मुख्यमंत्र्याबरोबर काम करण्याची संधी रजनीताईंना मिळाली.
• सन 1993 मध्ये परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली.
• या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळविला.
• 1999 पर्यंत त्यांनी विधान परिषदेच्या सदस्य म्हणून काम पाहिले.