राष्ट्रीय कृषी परिषद– रब्बी अभियान 2024
- मागीलपीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने आणि रब्बी हंगामासाठी पीक-निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतील एनएएससी संकुल येथे राष्ट्रीय कृषी परिषद- रब्बी अभियान 2024 चे उद्घाटन केले.
उद्दिष्ट
- अत्यावश्यक कृषी सामग्रीचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने सर्व संबंधितांमध्ये अभिनव कृषी पद्धती आणि डिजिटल उपक्रमांबाबत चर्चेला प्रोत्साहन देणे, हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
राज्य कृषी परिषदेवर गणेश शिंदे नियुक्त
- व्याख्यातेगणेश शिंदे यांची राज्याच्या कृषी परिषदेवर संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
- तेमहात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचेही सदस्य आहेत.
- तेमुळचे नगर तालुक्यातील पारगाव भातोडीचे – रहिवासी आहेत.
- राज्याच्याकृषी – परिषदेत असताना त्यांना सर्व कृषी विद्यापीठांच्या ध्येयधोरणासाठी कार्य करण्याची संधी मिळाली.
‘डायलिसिस’ च्या मोफत उपचाराचा हरियाणा सरकारचा निर्णय
- निवडणुकीतीलआश्वासनांची पूर्तता म्हणून, हरियाणातील सर्व सरकारी रुग्णालयांत मूत्रपिंडाच्या विकाराने आजारी असणाऱ्या रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा देण्यात येणार आहे.
- मुख्यमंत्रीनायबसिंह सैनी यांनी ही घोषणा केली.
पं. गाडगीळ यांचे निधन
- संस्कृतचाप्रचार आणि प्रसारासाठी आयुष्यभर जीवनभर कार्यरत असलेले ‘शारदा ज्ञानपीठम’चे संस्थापक पं. वसंतराव अनंत गाडगीळ (वय 94) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
- पं. वसंतरावगाडगीळ यांनी धर्म, संस्कृती, आणि इतिहास या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले.
- त्यांनीअनेक वर्षे संस्कृत भाषेच्या संसोधनात व्रतस्थपणे कार्य केले होते. धर्मशास्त्र, संस्कृत वाङ्मय आणि भारतीय संस्कृतीवर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. त्यांनी काही वर्षे पत्रकारिताही केली.
- ‘शारदा’ यामासिकाचे ते संस्थापक संपादक होते.त्यांनी काही पुस्तकांचे लेखन आणि प्रकाशन केले होते.
- डॉ. ग. बा. पळसुलेयांचे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनगाथा असलेले महाकाव्य ‘वैनायकम’ हा त्यापैकी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे.
- भांडारकरप्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाचे गाडगीळ माजी अध्यक्ष होते.
- हिंदूधर्मशास्त्राचे अभ्यासक असलेल्या गाडगीळ यांनी अनेक वर्षे ऋषिपंचमीला ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबवला.
- संस्कृतमधीलअतुलनीय योगदानाबद्दल त्यांना 2021 मध्ये म. श्रृंगेरी शारदापीठ, शंकराचार्यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
- सोरटीसोमनाथच्या सोमेश्वराची प्राणप्रतिष्ठा भारताचे पहिले राष्ट्रपती पो डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते 1952 मध्ये झाली. त्या वेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या पुढाकाराने तरुण वयातील वसंतराव गाडगीळ यांना स्वयंसेवकाची भूमिका देण्यात आली होती.
- संस्कृतभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष दखल घेतली होती.
- ‘आहममातरम् वंदे’ हा ‘वंदे मातरम’चा संस्कृत पाठ देशाच्या सर्व राज्यांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम हाती घेतली होती.
- पुण्यातीलअनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते.