Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (NIRF:- NATIONAL INSTITUTE RANKING FRAMEWORK )आयआयटी मद्रास प्रथम स्थानी

  • Home
  • Current Affairs
  • राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत (NIRF:- NATIONAL INSTITUTE RANKING FRAMEWORK )आयआयटी मद्रास प्रथम स्थानी

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी – 2023 जाहीर केली आहे.

मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षीही ‘एनआयआरएफ’ च्या सर्वसाधारण क्रमवारीत भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच ‘आयआयटी मद्रास’ने उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम स्थान पटकावले आहे.

दुसऱ्या स्थानी आयआयएससी बेंगळूर आहे तर आयआयटी मुंबईला मागे टाकत तिसऱ्या स्थानी ‘आयआयटी दिल्ली’ने बाजी मारली आहे .

यावर्षी आयआयटी मुंबईला चौथे स्थान मिळाले आहे .आयआयटी मुंबई व्यतिरिक्त मुंबईतील राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेला व्यवस्थापन श्रेणीमध्ये सातवे, रसायन तंत्रज्ञान संस्थेला औषधशास्त्र श्रेणीमध्ये पाचवे आणि पुण्यातील डी. वाय. पाटील विद्यापीठाने दंतशास्त्र श्रेणीमध्ये तिसरे स्थान मिळाले आहे.

राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी- 2023 ही सर्वसाधारण, विद्यापीठे ,अभियांत्रिकी व्यवस्थापन, महाविद्यालय, औषधशास्त्र वैद्यकीय ,वास्तुशास्त्र आणि नियोजन, विधी, दंतशास्त्र, संशोधन संस्था, कृषी आणि संलग्न क्षेत्रे या श्रेणीमध्ये जाहीर करण्यात येते.

विविध श्रेणीनुसार अव्वल महाविद्यालय व विद्यापीठे

सर्वसाधारण – आयआयटी मद्रास

विद्यापीठ – भारतीय विज्ञान संस्था, बेंगळूरु

अभियांत्रिकी– आयआयटी मद्रास

व्यवस्थापन – आयआयएम अहमदाबाद

महाविद्यालय – मिरंडा हाऊस ,दिल्ली

औषधशास्त्र – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद

वैद्यकीय :- अखिल भारतीय आयुर्वेज्ञान संस्था, दिल्ली

वास्तुशास्त्र आणि नियोजन :- आयआयटी रुरकी

विधी :- भारतीय राष्ट्रीय विधी विद्यापीठ, बंगळूर

दंतशास्त्र :- सविथा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेस, चेन्नई

संशोधन संस्था :- भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

कृषी आणि संलग्न क्षेत्र :- भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली

सर्वोच्च दहा विद्यापीठे

1) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू

2) जवारहालाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली

3) जामिया मिलिया इस्लामीया, नवी दिल्ली

4) जाधवपूर विद्यापीठ, कोलकाता

5) बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

6) मणीपाल उच्च शिक्षण अकादमी, मणीपाल

7) अमृता विश्व विद्यापीठम, कोईम्बतूर

8) वेल्लोर तंत्रज्ञान संस्था, वेल्लोर

9) अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, अलिगढ

10) हैद्राबाद विद्यापीठ, हैद्राबाद

National Institute Ranking Framework (NIRF):-

नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क ( एनआयआरएफ ) ही मानव संसाधन विकास मंत्रालय (एमएचआरडी) भारत सरकारच्या उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन करण्यासाठी स्वीकारलेली एक पद्धत आहे.

फ्रेमवर्क एमएचआरडीने मंजूर केले आणि 29 सप्टेंबर 2015 रोजी मानव संसाधन विकास मंत्री यांनी लाँच केले.

2016 या वर्षी पहिली यादी प्रकाशित करण्यात आली.

विद्यापीठ आणि महाविद्यालये, अभियांत्रिकी संस्था, व्यवस्थापन संस्था, औषधनिर्माणशास्त्र संस्था आणि वास्तुविद्या संस्था जसे त्यांच्या कार्यक्षेत्रांवर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांसाठी स्वतंत्र रँकिंग आहेत. संसाधने, संशोधन आणि भागीदार समज यासारख्या रँकिंग हेतूंसाठी फ्रेमवर्क अनेक मापदंडांचा वापर करते. या पॅरामीटर्सचे पाच क्लस्टरमध्ये वर्गीकरण केले गेले आहे आणि या क्लस्टर्सना काही विशिष्ट वजन दिले गेले आहेत. वेटेज संस्थेच्या प्रकारावर अवलंबून असतात. पहिल्या मानांकनात सुमारे 3500 संस्थांनी स्वेच्छेने सहभाग घेतला.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *