- व्हिएतनामच्याडॉक्टर गुयेन थी न्गोक फुओंग, इंडोनेशियाच्या फरविजा फरहान, जपानमधील लोकप्रिय अॅनिमेटर मियाझाकी हायाओ, थायलंडस्थित ‘द रुरल डॉक्टर्स मूव्हमेंट’ हा डॉक्टरांचा गट, भूतानमधील कर्मा फुंतशो यांना या वर्षाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
- त्यांनामनिला येथील मेट्रोपॉलिटन थिएटरमध्ये पुरस्कार आणि रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
- ‘समोरअसलेल्या अनेक आव्हानांना तोंड देऊन त्यांचा धैर्याने सामना करणाऱ्या व्यक्तींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
- अमेरिका-व्हिएतनामयुद्धादरम्यान अमेरिकी सैन्याने ‘एजंट ऑरेंज’ नावाचे विषारी रसायन पिके नष्ट करण्यासाठी वापरले होते.
- त्याच्याविनाशकारी आणि दीर्घकालीन परिणामांवर फुओंग यांनी विस्तृत संशोधन केले आहे.
- थायलंडच्याग्रामीण गरिबांना पुरेशी आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी तेथील डॉक्टर प्रयत्नशील असल्याने त्यांची निवड करण्यात आली.
- इंडोनेशियाच्याफरहान यांनी पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय कार्य केल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली.
- जपानीअॅनिमेटर हायाओ यांनी लहान मुलांसमोरील गुंतागुंतीचे प्रश्न हाताळले आहेत.
- भूतानचेशिक्षणतज्ज्ञ फुंतशो यांचे कार्य अभिमानास्पद असल्याने निवड समितीने जाहीर केले.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- आशियाचानोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील “द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन” तर्फे दरवर्षी देण्यात येतो.
- फिलिपाईन्सचेमाजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने 1957 पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला.
- सरकारीसेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
- यापुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.
- रॅमनमॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय – आचार्य विनोबा भावे
नव्या तीन वंदे भारत रेल्वेगाड्यांचे लोकार्पण
- पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी तीन नव्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.
- पंतप्रधाननरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले.
- यातीन रेल्वे चेन्नई-नगरकोईल, मदुराई ते बंगळूर आणि मेरठ ते लखनौ अशा धावणार आहेत.
- देशभरातसध्या 102 वंदे भारत रेल्वे धावत असून तीन कोटींपेक्षा अधिक लोकांनी या रेल्वेतून प्रवास केला आहे.
- वंदेभारत रेल्वेची सुरवात 15 फेब्रुवारी 2019 च्या मेक इन इंडियानुसार केली होती.
- आजघडीलाशंभरापेक्षा अधिक वंदे भारत रेल्वे असून या रेल्वेमुळे देशातील 280पेक्षा अधिक जिल्ह्यांना जोडण्यात आले आहे.
- लोकांनावेगवान आणि आरामदायी प्रवासाचा जागतिक दर्जाचा अनुभव प्रदान केला जाणार आहे.
- स्वदेशतंत्रज्ञानाने रेल्वेची निर्मिती केली आहे. यात कवच तंत्रज्ञान, 360 अंशात फिरणारी खुर्ची, दिव्यांगांना अनुकूल स्वच्छतागृहांची सुविधा आणि इंटिग्रेटेड ब्रेल सायनेस बसविले आहे.
फेडरल बँकेतर्फे पहिली फेशियल पेमेंट सिस्टीम दाखल
- फेडरलबँकेने ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फेशियल पेमेंट सिस्टीम ‘स्माईलपे’ दाखल केले.
- फेशियलपेमेंट सिस्टम SmilePayलाँच करणारी भारतातील पहिली बँक ठरली
- एकक्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना त्यांच्या चेहऱ्याचा वापर करून व्यवहार पूर्ण करता येतात.
- फेडरलबँकेच्या कार्यकारी संचालक शालिनी वॉरियर यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
- रिलायन्सरिटेल आणि अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग कंपनीच्या निवड शाखांमध्ये या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रायोगिक वापर सुरू करण्यात आला आहे.
- आर्थिकस्वातंत्र्य आणि सोयीसाठी तसेच कार्यक्षम आर्थिक पर्यावरणाकडे जाणारे हे महत्त्वाचे पाऊल आहे.
- यातंत्रज्ञानामुळे ग्राहकांच्या बँकिंग अनुभवात क्रांतिकारी बद्दल होईल.
- ‘ स्माईलपे’ द्वारे ग्राहकांना केवळ चेहरा स्कॅन करून खरेदी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून रोख रक्कम कार्ड किंवा मोबाईल शिवाय व्यवहार पूर्ण करता येणार आहेत.
‘एआय लॅब‘साठी गुगलसोबत करार
- तमिळनाडूतगुंतवणूक आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी अमेरिकेत अॅपल, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट या तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या कार्यालयांना भेटी देऊन गुंतवणूक; तसेच भागीदारीच्या संधींविषयी चर्चा केली.
- तमिळनाडूमध्ये’नान मुधलवन’ योजनेअंतर्गत 20 लाख तरुणांना कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘एआय’ कौशल्ये प्रदान करण्यासाठी ‘एआय लॅब’ उभारण्याबाबत गुगलसोबत करार करण्यात आला.
- ‘विविधसंधी आणि भागीदारी याविषयी चर्चा केली.
- हीभागीदारी मजबूत करण्यासाठी आणि तमिळनाडूला आशियातील आघाडीचे विकास क्षेत्र बनवण्यासाठी कटिबद्ध आहे
- तमिळनाडूमध्ये’एआय लॅब’ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या उपस्थितीत गुगलसोबत सामंजस्य करार करण्यात आला.
रुबिना फ्रान्सिसला कांस्यपदक
- भारताच्यारुबिना फ्रान्सिसने पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजीच्या ‘एसएच 1’ वर्गीकरणातील महिलांच्या एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
- पॅरालिम्पिकस्पर्धेत भारताचे नेमबाजीतील हे चौथे पदक ठरले.
- रुबिनानेअंतिम फेरीत1गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
- रुबिनामध्य प्रदेशातील जबलपूर या ठिकाणची आहे.