● भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी पराग जैन यांची गुप्तहेर संस्था ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग’ चे (रॉ) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
● सद्यःस्थितीत ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’चे (एआरसी) प्रमुख असलेले जैन यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती.
● या मोहिमेदरम्यान पाकिस्तानी हवाईदल आणि लष्करी तळांची त्याचप्रमाणे दहशतवादी संघटनांच्या तळांची अचूक माहिती मिळविण्यात जैन यांचा मोठा वाटा होता.
● पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश असलेल्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने ‘रॉ’ प्रमुखपदी जैन यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे.
● भारतीय पोलिस सेवेच्या 1989 च्या तुकडीचे पंजाब केडरचे अधिकारी असलेले जैन एक जुलैला पदाची सूत्रे स्वीकारतील.
● मावळते ‘रॉ’ प्रमुख रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपला.
● ‘रॉ’चे प्रमुख म्हणून जैन यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.
● ‘एव्हिएशन रिसर्च सेंटर’चे प्रमुख होण्याआधी पराग जैन यांनी चंडीगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक, लुधियानाचे पोलिस उपमहानिरीक्षक यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.
● कॅनडा, श्रीलंका यासारख्या देशांमध्ये भारतीय वकिलातींमधील महत्त्वाची पदे त्यांनी सांभाळली होती. जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणे, ऑपरेशन बालाकोट यासारख्या मोहिमांमध्येही गोपनीय माहितीचे संकलन आणि विश्लेषणात त्यांची निर्णायक भूमिका राहिली होती.
● मालदीव आणि बांगलादेशमध्ये निर्माण झालेले राजकीय संकट आणि भारतविरोधी मोहिमांमुळे दक्षिण आशियात भारतीय प्रभावाला बसलेला धक्का यामुळे ‘रॉ’च्या कार्यपद्धतीवर टीका झाली आहे. या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जैन यांच्या हाती ‘रॉ’च्या प्रमुखपदाची धुरा येत आहे.
● पराग जैन हे दीर्घकाळ केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत आणि ते कॅबिनेट शाखेत काम करत आहेत.त्यांना गुप्तचर आणि राष्ट्रीय सुरक्षेचा दीर्घ अनुभव आहे.
● जम्मू आणि काश्मीरमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दहशतवादविरोधी रणनीती आखण्यात आणि अंमलात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पंजाब कॅडरला मिळाला दुसऱ्यांदा बहुमान!
● विशेष बाब म्हणजे, रिसर्च अँड अनालिसिस विंग (RAW) चे प्रमुख असलेले आणि जून 2023 मध्ये निवृत्त झालेले पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी सामंत गोयल यांच्यानंतर, ही महत्त्वाची जबाबदारी पंजाब कॅडरचे दुसरे अधिकारी पराग जैन यांना देण्यात आली आहे. पराग जैन हे 1989च्या पंजाब कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
ऑपरेशन सिंदूरमध्ये घेतली महत्त्वाची भूमिका?
● सध्या, जैन हे एव्हिएशन रिसर्च सेंटरचे प्रमुख आहेत, जिथे त्यांनी पाकिस्तानी लष्करी कारवाया आणि दहशतवादी लपण्याच्या ठिकाणांवरील महत्त्वाच्या गुप्त माहिती गोळा करण्याचे काम पाहिले, ज्यामुळे भारतीय सैन्याच्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या पत्नी सीमा जैन, ज्या 1992 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत, त्या देखील दिल्लीत प्रतिनियुक्तीवर आहेत.
रवी सिन्हा यांच्याविषयी…
● 30 जून रोजी निवृत्त होत असलेले सध्याचे RAW प्रमुख रवी सिन्हा हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते छत्तीसगड केडरचे आहेत आणि त्यांना ऑपरेशन मॅन म्हणून ओळखले जाते.
● त्यांनी त्यांच्या कार्यशैलीने गुप्तचर जगात एक विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली RAW ने अनेक महत्त्वाच्या मोहिमा राबवल्या.
RAW (Research and Analysis Wing)
● स्थापना : 21 September 1968
● मुख्यालय: नवी दिल्ली
● मोटो : धर्मो रक्षति रक्षित:
● पहिले प्रमुख: रामेश्वरनाथ काव



