Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

रोहिदास पाटील यांचे निधन

रोहिदास पाटील यांचे निधन

रोहिदास पाटील यांचे निधन

●खान्देशचे नेते व माजी मंत्री रोहिदास (दाजीसाहेब) चुडामण पाटील यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
●अक्कलपाडा प्रकल्पाचे जनक असलेले रोहिदास पाटील ‘दाजीसाहेब’ या नावाने खान्देशात परिचित होते.
●महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दीर्घ काळ मंत्री राहिलेले रोहिदास पाटील मूळचे धुळे शहराजवळील मोहाडी येथील असून, त्यांचा जन्म १३ जून १९४० रोजी रवंदळे कुटुंबात झाला.
●रोहिदास पाटील इंदूर येथील जीएसटीआय महाविद्यालयात बी ई मेकॅनिकलची पदवी संपादन केली.
●शिक्षणानंतर सुरुवातीच्या काळात पाटील बंधू या फर्मखाली मोटरसायकल एजन्सी सुरू केली.
●राजकारणाची बाळकडू घरातूनच मिळाल्याने त्यांनी युवक काँग्रेसच्या चवळीपासून आपल्या राजकीय कारकीर्दला सुरुवात केले .
●अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेसची एकनिष्ठ राहिले.
●1972 मध्ये मुकटी गटातून जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली.
●1978 यावर्षी कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत प्रथमच ते आमदार झाले.
●तेव्हापासून २००९ पर्यंत सलग सात वेळा ते या मतदारसंघात विजयी ठरले.
●माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.
●एकनिष्ठ, निष्कलंक, धडाकेबाज निर्णय घेणारे मंत्री म्हणून त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा होता.
●महसूल राज्यमंत्री म्हणून १२ मार्च १९८६ रोजी त्यांची प्रथमच राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली.
●आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी कृषी व फलोत्पादनमंत्री, कामगार, रोजगार आणि ग्रामविकासमंत्री, पाटबंधारेमंत्री, गृहनिर्माण, पुनर्बाधणी ,संसदीय कार्यमंत्री, कृषी व पशुसंवर्धन अशा विविध खात्यांचा पदभार सांभाळला.
●२२ वर्षे ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते.
●राज्य सरकारने १९९८-९९मध्ये त्यांचा उत्कृष्ट संसद पट्टू म्हणून गौरव केला होता.
●जिल्हा परिषद सदस्य धुळे बाजार समितीचे सभापती, धुळे खरेदी- विक्री संघाचे चेअरमन, जिल्हा बँकेचे संचालक ,महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन संचालक, इंडियन फार्मर्स फर्टीलायझर को ऑपरेटिव्ह संस्थेचे संचालक, अशा विविध संस्थांचे त्यांनी यशस्वीपणे कामकाज सांभाळले

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *