लमीतीए-2024′ या संयुक्त युद्ध सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराच्या तुकडीचे सेशेल्सकडे (पूर्व आफ्रिकेतील एक देश) प्रस्थान. SDF म्हणजेच सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यान दहाव्यांदा हा युद्ध सराव होत आहे. 18 ते 27 मार्च 2024 या काळात सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्ध सराव केला जाणार आहे.
अधिक माहिती
• क्रेऑल भाषेत ‘लमीतीए’ या शब्दाचा अर्थ- मैत्री- असा होतो.
• लमीतीए हा द्वैवार्षिक प्रशिक्षणात्मक युद्धसराव 2001 पासून सेशेल्समध्ये घेतला जातो.
• भारतीय लष्कराची गोरखा रायफल्स व SDF यांचे प्रत्येकी 45 जवान यामध्ये सहभागी होत आहेत.
उद्देश
• संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतिसेना मोहीम सनदी’च्या सातव्या भागाअंतर्गत निम-शहरी भागात अर्ध-पारंपरिक कारवायांदरम्यान परस्परांच्या क्षेत्रात कारवाई करण्याच्या क्षमता वाढवणे, हा या युद्ध सरावाचा उद्देश आहे.