- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा केली आहे.
- मुलांसाठीच्या ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’ अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6 हजार रुपये दिले जाणार असून, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये मिळणार आहेत,तसेच पदवीधर तरुणांना 10 हजार रुपये विद्यावेतन मिळेल.
- प्रशिक्षणात (अप्रेन्टिसशिप) सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे.
- मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना सुरू केली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत.
- बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्या युवकांना त्यांनी नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जाईल. मात्र, ज्या उमेदवारांचे शिक्षण सुरु असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्ज दाखल करणाऱ्या युवकांचे वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.
- राज्य सरकार महाराष्ट्राच्या रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून रक्कम देणार आहे.
- युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- युवकांना संबंधित कंपन्यांमध्ये सहा महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
- युवकांना सहा महिने स्टायपेंडची रक्कम दिली जाणार आहे.
- राज्य सरकार युवकांच्या विद्यावेतनाचा खर्च करणार आहे. ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’द्वारे दरवर्षी दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
- संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचे काम योग्य वाटल्यास त्यांना तिथे नोकरी देऊ शकतात. याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात.