वन्यजीव सप्ताह
- वन्यप्राणीआणि त्यांचा अधिवास सुरक्षित राहावा याकरिता जनजागृती करण्याच्या उद्देशाने मागील सात दशकांपासून भारतात दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.
- जंगलक्षेत्रातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित राहून त्यांचे संरक्षण व संवर्धन व्हावे हा त्यामागचा खरा उद्देश आहे कारण पृथ्वीवर राहण्याचा जेवढा हक्क माणसांना आहे तेवढाच हक्क प्राण्यांना आहे.
वन्यजीव सप्ताहाची सुरुवात
- जैवविविधतेचाघटक असलेले वन्य प्राणी हे मानवी जीवनाचाही एक अविभाज्य घटक आहेत.
- यावन्यजीवांच्या निसर्गातील महत्त्वाविषयी त्यांच्या जनजागृती विषयी माहिती व्हावी म्हणून केंद्रीय वन्यजीव मंडळाने वन्यजीव सप्ताहासाठी पुढाकार घेतला.
- केंद्रीयवन्यजीव मंडळाच्या स्थापनेनंतर भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 1952 या वर्षी वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडण्यात आली.
- सुरुवातीला1955 साली वन्यजीव दिन साजरा करण्यात आला आणि त्यानंतर 1957 मध्ये वन्यजीव सप्ताहाची सुरुवात झाली.
संकल्पना:
- 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होणारा वन्यजीव सप्ताह दरवर्षी एका संकल्पनेवर आधारित असतो.
- 2024 या वर्षाची वन्यजीव सप्ताहाची संकल्पना :- ‘सहजीवनाद्वारे वन्यजीव संरक्षण‘



