‘रिझ’ या इंग्लिश शब्दानं शब्दकोश प्रकाशक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचा 2023 साठीचा ‘वर्ड ऑफ दी इयर’ होण्याचा मान यंदा पटकावला. एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव, अर्थात ‘कॅरिस्मा’ या शब्दाचं हे संक्षिप्त रूप आहे. ‘आपली स्टाइल, ‘ प्रभाव आणि आकर्षणाद्वारे समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे खेचून घेण्याची एखाद्याची क्षमता,’ असा या शब्दाचा साधारण अर्थ होतो.
● क्रियापद आणि विशेषणही : ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार, ‘रिझ’ या शब्दाचा इंग्रजी भाषेत क्रियापद म्हणून वापर होतो.
● ‘रिझ अप’, अर्थात एखाद्याला आकर्षित करणं, भुलवणं किंवा फशी पाडणं अशा प्रकारे हा शब्द वापरला जातो.