फिनलंडने सलग सातव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देशाचा किताब पटकावला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ‘वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट’नुसार, आनंदी देशांच्या क्रमवारीत नॉर्डिक देशांचे वर्चस्व कायम आहे. फिनलंडनंतर या यादीत डेन्मार्क, आइसलँड आणि स्वीडनचे नाव आहे. नव्या World Happiness Report 2024 नुसार, फिनलंड (Finland) हा जगातील सर्वात आनंदी देश आहे.
जगातील पाहिले दहा आंनदी देश
क्र. देश क्र. देश
1 फिनलंड – 6 नेदरलंड्स
2 डेन्मार्क – 7 नॉर्वे
3 आइसलंड – 8 लक्झेंबर्ग
4 स्वीडन – 9 स्वित्झर्लंड
5 इस्रायल – 10 ऑस्ट्रेलिया
आनंदी देशाच्या यादीत भारत 126 व्या स्थानावर
• 2024 मधील आनंदी राष्ट्रांच्या मोजमापाच्या या यादीत असणाऱ्या 143 राष्ट्रांमध्ये भारत 4.054 या स्कोअरसह 126 व्या स्थानावर आहे.
• या यादीत सगळ्यात शेवटी अफगाणिस्तानचा नंबर लागतो.
• श्रीलंका आणि बांगलादेश ही भारताच्या शेजारील राष्ट्रे या यादीत अनुक्रमे 128 आणि 129 व्या स्थानावर आहेत.
• पाकिस्तान या यादीत 108 व्या स्थानावर असल्याचे दिसून येते.
निकष
• प्रत्येक राष्ट्रातील GDP, सामाजिक समर्थन,वयक्तिक स्वातंत्र्य, भ्रष्टाचाराचे स्तर हे घटक विचारात घेऊन जागतिक आनंदी देशांचा अहवाल प्रकाशित केला जातो.
• द वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट हा सस्टनेबल डेव्हलोपमेन्ट नेटवर्क सोल्युशन्स द्वारे प्रकाशित केला जातो.
• पहिला जागतिक आंनदी अहवाल हा 1 एप्रिल 2012 रोजी प्रकाशित करण्यात आला होता.