केनीयाचा आंतरराष्ट्रीय धावपटू केल्विन किप्टम याचा कार अपघातात मृत्यू झाला. 24 वर्षीय केल्विनने मॅरेथॉनमध्ये जागतिक विक्रम रचला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये – त्यालाच सुवर्णपदकासाठी ‘फेव्हरिट’ समजले जात होते. मात्र, त्याआधीच त्याच्यासोबत त्याच्या प्रशिक्षकांचीही मृत्यू झाला आहे.
मॅरेथॉनमधील विक्रमी वेळ…
● मागील दोन वर्षांत केल्विनने धावण्याच्या शर्यतीत आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले होते.
● त्याच्या धावण्याचा ‘अभ्यास’ ही जगभरातील धावपटू करायला लागले होते.
● आतापर्यंत तो तीन ‘एलिट मॅरेथॉन’मध्ये धावला.
● या तिन्ही मॅरेथॉनमध्ये त्याने बाजी मारली. त्याच्या तिसऱ्या मॅरेथॉनमध्ये तर त्याने चक्क इतिहास रचला.
● त्याने ४२.१९५ किलोमीटर अंतराची शर्यत दोन तास आणि ३५ सेकंदांत पूर्ण करून जागतिक विक्रमाची नोंद केली होती.
● अमेरिकेतील शिकागो मॅरेथॉनमध्ये गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने हा विक्रम रचला होता.
● त्याने केनियाच्या एलिद किपचोगेचा विक्रम मोडला होता.
● गेल्या वर्षी लंडन मॅरेथॉन जिंकताना त्याने दोन तास, एक मिनिट आणि २५ सेकंद वेळ नोंदवली होती.