Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड

विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड

विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड

  • भाजपचे नेते राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतिपदी एकमताने निवड झाली.
  • हे पद भूषवणारे शिंदे हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत.
  • कर्जत-जामखेड मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता.
  • राम शिंदे यांची सभापतिपदी निवड करण्यासंदर्भातील प्रस्ताव श्रीकांत भारतीय यांनी सभागृहात मांडला.
  • गेल्या अडीच वर्षापासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त होते. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यानंतर आज राम शिंदे हे सभापती पदाच्या खुर्चीत बसले आहेत.
  • राम शिंदे यांचा जन्म १ जानेवारी १९६९ रोजी अहिल्यानगरच्या चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला.
  • गरिबीच्या परिस्थितीवर मात करत राम शिंदे यांनी एम. एस्सी. बीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी (जि. बीड) येथे प्रारंभीच्या काळात नोकरी केली.
  • सन १९९५ मध्ये तत्कालीन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी विकास प्रकल्पाची जबाबदारी प्रा. राम शिंदे यांच्यावर सोपवली.
  • १९९७ मध्ये भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून शिंदे यांनी निवडणूक लढवली परंतु अवघ्या २०० मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. २००० मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून सलग पाच वर्षे सरपंचपद मिळवले.
  • २००६ मध्ये भाजपाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी राम शिंदेंची निवड झाली. २००७ मध्ये पत्नी आशा शिंदे या भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून विजयी झाल्या.
  • २००९च्या विधानसभा निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून ते दहा हजार मतांनी विजयी झाले. तेव्हाच्या अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेश सरचिटणीस अशी जबाबदारी त्यांनी स्वीकारली.
  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राम शिंदे ४५ हजार मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले. त्यावेळी भाजपाच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून गृह, पणन, आरोग्य व पर्यटन खात्याचे काम शिंदेंनी सांभाळले.
  • त्यानंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्योग या खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. ते नगर जिल्ह्याचे पाच वर्षे पालकमंत्री राहिले आहेत.
  • उपपसभापती – नीलम गोऱ्हे

महाऊर्जा ला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार

  • राज्यात ऊर्जा संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेस केंद्र सरकारच्या विद्युत मंत्रालयातर्फे आयोजित ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2024’मधील ‘स्टेट एनर्जी एफिशियन्सी परफॉर्मन्स अॅवॉर्ड 2024 (ग्रुप १)’ या प्रकारात प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
  • ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे (ता. १४) हा पुरस्कार सोहळा झाला.
  • उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत केंद्रीय पारंपरिक आणि अपारंपरिक उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते महाऊर्जाच्या महासंचालक कादंबरी बलकवडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
  • ऊर्जा संवर्धन क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशपातळीवर हा पुरस्कार देण्यात येतो.
  • राज्य शासनाने ऊर्जा संवर्धन अधिनियम 2001 च्या तरतुदींची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी महाऊर्जा या संस्थेस पदनिर्देशित संस्था म्हणून नियुक्त केले आहे तसेच अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा मंत्रालयाची महाऊर्जा ही राज्य मूळ संस्था आहे
  • ऊर्जा मंत्रालयाची महाऊर्जा ही राज्य मूळ संस्था आहे.
  • ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा कार्यक्षम उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी महाऊर्जा आघाडीवर आहे.
  • महाऊर्जा व महावितरण मार्फत सौर कृषि पंपासाठी प्रधानमंत्री कुसुम घटक व योजना राज्यात राबविण्यात येत असून, आत्तापर्यंत एकूण 1 लाख 63 हजार 906 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.
  • सौर कृषी पंप आस्थापनेमध्ये राज्य देशात प्रथम स्थानावर आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *