Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

विम्बल्डन स्पर्धा – 2024

महिला एकेरीत क्रेजिकोवा विजेती

  • प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सलग आठव्या वर्षी नवविजेती मिळाली.
  • 13 जुलै रोजी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत चेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवाने इटलीच्या जैस्मिन पाओलिनीचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव करून विम्बल्डनमधील आपले पहिले जेतेपद पटकावले.
  • पाओलिनीला सलग दुसऱ्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • क्रेजिकोवाचे हे विम्बल्डनमधील पहिले, तर कारकीर्दीतील दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
  • यापूर्वी क्रेजिकोवाने 2021 मध्ये फ्रेंच स्पर्धा जिंकली होती.
  • क्रेजिकोवाने आत्तापर्यंत दुहेरीच्या 10 ग्रँड स्लॅम विजेतीपदे मिळवलेली आहेत, त्यातील दोन विजेतीपदे विम्बल्डनमधील आहेत.
  • विम्बल्डन स्पर्धेचे महिला एकेरीतील सर्वाधिक वेळा विजेतेपद अमेरिकेच्या मार्टिना नवरातिलोवा (9 वेळा)पटकावले.

विम्बल्डन स्पर्धा

  • 2024 ची एकूण 137 वी स्पर्धा
  • ठिकाण : लंडन
  • सुरवात : 1877
  • सर्वात जुनी ग्रँड स्लॅम स्पर्धा

ही स्पर्धा ग्रास कोर्ट वरती खेळवली जाते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *