सुशान दिन
- सुशासन दिन भारतात दरवर्षी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी(25 डिसेंबर )साजरा केला जातो .
- 2014 मध्ये भारतीय लोकांमध्ये सरकारमधील उत्तरदायित्वाबद्दल जागरूकता वाढवून पंतप्रधान वाजपेयी यांचा सन्मान करण्यासाठी सुशासन दिनाची स्थापना करण्यात आली.
- सुशासन दिनाच्या निमित्ताने सरकारने 19 ते 25 डिसेंबर या कालावधीत सुशासन सप्ताह आयोजित केला जातो.
- या सप्ताहात सेवा वितरण आणि प्रशासनाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पुढाकार घेतले जातात.
- सुशासन सप्ताह 2024 अंतर्गत, 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत देशातील 700 जिल्ह्यांमध्ये ‘प्रशासन गांव की ओर‘ अभियान राबवण्यात आले होते.
- या अभियानाचा उद्देश जन शिकायतींचे निवारण आणि सेवा वितरणात सुधारणा करणे हा होता.
व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पाच राज्यांच्या राज्यपालांच्या नियुक्त्या आणि बदल्या केल्याची घोषणा केली
- माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के.
- सिंह यांची मिझोरामच्या आणि माजी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती केली.
- ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. राष्ट्रपतींनी रघुवर दास यांच्या जागी मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी बाबू कांभमपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
- केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांची बिहारच्या राज्यपालपदी तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची केरळच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.