जागतिक हिंदी दिन
- हिंदीही भारताची अधिकृत भाषा आहे आणि जगभरातील लाखो लोक ती बोलतात.
- केवळभारतच नाही तर फिजीचीही हिंदी ही अधिकृत भाषा आहे. जागतिक हिंदी दिवस हा हिंदीचा जागतिक प्रभाव आणि तो सांस्कृतिक आणि भाषिक ऐक्याला कसा प्रोत्साहन देतो हे साजरे करतो.
- पंतप्रधानइंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे आयोजन केले होते ज्यात 30 देशांतील 122 प्रतिनिधी सहभागी झाले होते.
- महाराष्ट्रातीलनागपूर येथे ही परिषद झाली.
- जागतिकहिंदी दिवस हा हिंदीला जागतिक स्तरावर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक म्हणून ओळखण्याची आणि आंतरराष्ट्रीय प्रवचनात तिचा वापर वाढवण्याची संधी आहे.
- 14 सप्टेंबररोजी राष्ट्रीयहिंदी दिवस साजरा केला जातो तर 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो.
- 10 जानेवारी2006 रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पहिल्यांदा जागतिक हिंदी दिवस साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो.
- जागतिकहिंदी दिनाची थीम ‘एकता आणि सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज‘ आहे. भाषिक आणि आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी हिंदी भाषेचा वापर हायलाइट करणे हा या थीमचा उद्देश आहे.
- भाषेचासमृद्ध वारसा, साहित्यावरील तिचा प्रभाव आणि डिजिटल जगात तिची वाढती उपस्थिती साजरी करण्यासाठी जगभरात चर्चासत्र, कार्यशाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
शक्तिशाली पासपोर्ट असणाऱ्या देशात सिंगापूर अव्वल स्थानी
- जगातीलसर्वांत मजबूत पासपोर्टच्या यादीत सिंगापूरने अव्वल स्थान मिळवले आहे.
- हेन्लेपासपोर्ट इंडेक्सनुसार, सिंगापूरचा पासपोर्ट असलेली व्यक्ती जगभरातील 195 ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवास करू शकते. त्यानंतर जपानचा (193) दुसरा क्रमांक लागतो.
- जगातीलसर्वांत शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत भारताचे स्थान पाच स्थानांनी घसरले आहे. या यादीत भारत आता 80 व्या स्थानावरून 85 व्या स्थानावर आला आहे.
- हेन्लेपासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
- यायादीत 199 पासपोर्टची त्यांच्या व्हिसा-मुक्त प्रवेश मिळवू शकणाऱ्या ठिकाणांच्या संख्येनुसार क्रमवारी लावली जाते.
- हाहेन्ले पासपोर्ट इंडेक्स आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक संघटनेच्या विशेष आकडेवारीवर आधारित आहे.
- यानिर्देशांकानुसार, भारतीय पासपोर्टधारक 57 ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवास करू शकतो.
- यायादीत 2015 ते 2025 दरम्यान व्हेनेझुएलानंतर अमेरिका हा दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी घसरण नोंदवणारा देश ठरला आहे.
- अमेरिकादुसऱ्या क्रमांकावरून सात स्थानांनी घसरून नवव्या स्थानावर आहे, असे हेन्ली अँड पार्टनर्सच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
- 2015 पासून 32 स्थानांनी प्रगती करत, संयुक्त अरब अमिराती (युएई) हा सर्वांत वेगवान आघाडी घेणारा देश ठरला आहे.
- युएईचा पासपोर्ट असणारी व्यक्ती जगभरातील 185स्थळांवर व्हिसा- मुक्त प्रवास करू शकते.
- या यादीत सर्वांत खालच्या स्थानावर पाकिस्तान आणि येमेन हे देश आहेत.
शक्तिशाली पासपोर्ट असणारे पहिले दहा देश
1) सिंगापूर
2) जपान
3)फिनलंड
4) फ्रान्स
5)जर्मनी
6)इटली
7)दक्षिण कोरिया
8)स्पेन
9)ऑस्ट्रेलिया
10) डेन्मार्क
- हेन्लीपासपोर्ट इंडेक्स हे त्या देशांच्या सामान्य पासपोर्टद्वारे त्यांच्या नागरिकांसाठी परवानगी असलेल्या प्रवास स्वातंत्र्यानुसार देशांचे जागतिक क्रमवारी आहे.
- हे2005 मध्ये हेन्ले अँड पार्टनर्स व्हिसा निर्बंध निर्देशांक म्हणून लाँच करण्यात आले आणि जानेवारी 2018 मध्ये हेन्ले पासपोर्ट इंडेक्समध्ये अद्यावत केले.
‘वन स्टेट–वन रजिस्ट्रेशन‘ संकल्पना
- कोणत्याहीभागातील नागरिकास राज्यातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट-वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- मुख्यमंत्रीफडणवीस यांनी मुंबईत महसूल विभागाची आढावा बैठक घेतली, त्या वेळी त्यांनी सूचना दिली.
- राज्यातील जमीन मोजणीसाठी भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित ई-मोजणी राज्यात लागू करण्यात येणार असून, पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख सर्व विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात 30 कार्यालयांमध्ये भू-प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
- पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेअंतर्गत गावातील मिळकतीचे ड्रोनद्वारे ‘जीआयएस’ सर्वेक्षण आणि गावठाण भूमापन करण्यात येणार आहे.
कॉसमॉस सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रल्हाद कोकरे यांची नियुक्ती
- कॉसमॉसको-ऑपरेटिव्ह मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अॅड. प्रल्हाद कोकरे यांची, तर उपाध्यक्षपदी सीए यशवंत कासार यांची नियुक्ती करण्यात आली.
- निवडणूकनिर्णय अधिकारी संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या नवीन संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड झाली.
- हीनिवडणूक बँकेच्या 2025 ते 2029या कार्यकाळासाठी बिनविरोध झाली आहे.
- अॅड. कोकरेहे गेली 20 वर्षे बँकेच्या संचालक मंडळावर असून, राज्य सरकारच्या सहकार विभागात सहनिबंधक या पदावरून निवृत्त झाले आहेत.
- 2019 ते2021 या कालावधीत ते बँकेचे उपाध्यक्ष होते.
- गेल्या20 वर्षांत संचालकांच्या विविध समित्यांवर ते कार्यरत आहेत.
- उपाध्यक्षकासार हे सनदी लेखापाल असून, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंग्लंड अँड वेल्सचे सदस्य आहेत.
- ते2019 पासून कॉसमॉस बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असून, चार्टर्ड अकाउंटंट इन को-ऑपरेटिव्ह बँक्सचे (सीएसीओबी) सचिव आहेत.
स्वच्छ आहार संकल्प
- भारतीयअन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसएआय) पश्चिम क्षेत्र, 12 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी स्वच्छ आहार संकल्प ह्या व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.
- केंद्रीयआरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- बुलढाणाशहरात चिखली रोड, विद्या नगरी येथील सहकार विद्या मंदिर शाळेत आयोजित होणाऱ्या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण कार्यक्रमात रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे 2000 पेक्षा जास्त विक्रेते सहभागी होणार आहेत.
- अन्नपदार्थहाताळणीच्या सुरक्षित पद्धतींवर यामध्ये भर असेल. जे लोक अन्न पदार्थांची हाताळणी, साठवणूक, शिजवणे आणि उत्पादन आणि सेवा यांच्याशी संबंधित असतील त्यांनी अन्नपदार्थ दूषित होऊ नयेत आणि ग्राहकांना सुरक्षेची हमी मिळेल यासाठी स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या कठोर मानकांचे पालन करावे हे सुनिश्चित करण्याचा एफएसएसआयचा (Food Safety and Standards Authority of India)उद्देश आहे.
- रस्त्यावरीलखाद्यपदार्थ हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक जिवंत उदाहरण आहे, जे देशाच्या विविध पाककृती परंपरा, विशिष्ट चव आणि सामाजिक परिदृश्याचे दर्शन घडवते.
- त्याच्यावाढत्या लोकप्रियतेसह, ग्राहकांसाठी त्याची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि त्याचबरोबर रस्त्यावरील या आवडत्या पदार्थांची निर्मिती करणाऱ्या विक्रेत्यांना पाठबळ देणे देखील महत्त्वाचे आहे.
- एफएसएसआयचा एफओएसटीएसी कार्यक्रम अन्न हाताळणाऱ्यांना, ज्यामध्ये रस्त्यावरील विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानके राखण्यासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी तयार केला गेला आहे.
- याप्रशिक्षणात वैयक्तिक स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्नपदार्थ दूषित होण्यास प्रतिबंध यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.
- विक्रेत्यांनानियामक अनुपालन आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींबद्दल शिक्षित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
- हाकार्यक्रम केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री यांनी 2023 च्या जागतिक अन्न सुरक्षा दिनी केलेल्या घोषणेला अनुसरून आहे.
- ज्यामध्ये2025-2026 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अन्न हाताळणी करणाऱ्या5 दशलक्ष जणांना प्रशिक्षण देण्याचे काम एफएसएसआयला देण्यात आले आहे.
- मुंबईमहानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि एफएसएसआयचे चे सीईओ जी. कमला वर्धन राव यांच्या सह-अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या उपक्रमाला पुढे नेण्यात आले.