Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम-2023

  • Home
  • Current Affairs
  • संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम-2023

संरक्षण मंत्रालयाद्वारे, राष्ट्रीय आणि प्रादेशिक माध्यम संस्थांमधील निवडक पत्रकारांसाठी आयोजित, तीन आठवड्यांचा संरक्षण वार्ताहर अभ्यासक्रम (DCC) 2023, दिनांक  21 ऑगस्ट 2023 रोजी पूर्व नौदल कमांड (ईएनसी), विशाखापट्टणम येथे सुरू झाला. संरक्षण मंत्रालयातील प्रवक्ते आणि अपर महासंचालक (माध्यमे आणि संज्ञापन) ए भारत भूषण बाबू यांनी सागरी युद्ध केंद्रातील संरक्षण पत्रकारिता अभ्यासक्रमाची  माहिती दिली.

उदिष्ट:

या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट माध्यमे आणि सैन्य यांना परस्परांच्या अधिक जवळ आणणे आणि सर्व स्तरावर पत्रकारांना सशस्त्र दलांच्या कामगिरीचे अधिक चांगले आकलन व सागरी वृत्तांकनासाठी सक्षम करणे, हे आहे. एक आठवड्याच्या अभ्यासक्रमादरम्यान, सहभागींना नौदल आणि तटरक्षक दलातील विषयतज्ज्ञ माहिती देतील. ते पत्रकारांना नौदलाच्या नौदल संचालन, नौदल कूटनीती, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण, नौदल आणि तटरक्षक दलाची संघटनात्मक रचना यासह नौदलाच्या विविध पैलूंबाबत अवगत  करतील. अभ्यासक्रमांतर्गत सहभागींनी 21 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय नौदल जहाज आणि पाणबुडीला भेट दिली.जहाजावर राहण्याच्या अनुभवाबद्दल त्यांना माहिती देण्यात आली. समुद्रात भारतीय नौदलाच्या अग्रणी युद्धनौकेवरून नौदलाच्या सागरी मोहिमांविषयी जाणून घेणे, हे या टप्प्यातील अभ्यासक्रमाचे प्रमुख आकर्षण आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *